Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीउपजिल्हाधिकारी घुगे यांना लाच घेतांना वाशीम ACB ने असे रंगेहात पकडले...कारवाईचा Video...

उपजिल्हाधिकारी घुगे यांना लाच घेतांना वाशीम ACB ने असे रंगेहात पकडले…कारवाईचा Video सोशल मिडीयावर व्हायरल…पाहा video

काल बुलडाणा उपजिल्हाधिकारी, भिकाजी घुगे लिपिकसह एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना वाशीम एसीबीचे DYSP श्री गजानन शेळके यांच्या टीमने धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईची Video सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोबतच वाशीम ACB चे कारवाईचे कौतुकही करीत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पात हिंगणा ईसापूर ता नांदुरा येथील एका शेतकऱ्याची जमीन गेली होती त्याचा मोबदला देण्याच्या नावाखाली बुलडाणा मध्यम प्रकल्प कार्यालयच्या उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी एकूण मोबदल्याचे 10 टक्के अर्थात 2 लाखाची मागणी केली होती व त्याला कार्यालयात कार्यरत लिपिक खरात यांनी प्रोत्साहन दिलं होतं. तसेच एडव्होकेट अनंता देशमुख यांनी मध्यस्थी केली होती.

त्या शेतकऱ्याने याची तक्रार वाशीम एसीबी कडे केली असता काल दिनांक 28 डिसेंबर रोजी सापळा रचून मध्यम प्रकल्प कार्यालय परिसरात उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,लिपिक नागेश खरात यांच्यासाठी 1 लाखाची लाचेची रक्कम स्वीकारतांना एडव्होकेट अनंता देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आले. या कारवाई नंतर एसीबी पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपिक खरात व एडव्होकेट देशमुख यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर बुलढाणा जिल्हा महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: