पातूर – निशांत गवई
पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम कोसगाव येथील जि. प. शाळेवरील स. अ. असलेल्या दिनेशकुमार मुंडे हे नेहमीच मद्यप्राशन करून शाळेत येऊन विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात आल्या होत्या मात्र या गंभीर बाबीचि दखल वंचित बहुजन आघाडी चे उपासभापती इम्रान खान यांनी दिनांक 14 ऑगस्ट रोजी कोसगाव गाठून मद्यपी शिक्षक दिनेशकुमार मुंडे यांना दवाखान्यात आणून त्यांची तपासणी करण्यात आली होती.
तपासणी चा अहवाल अजून प्राप्त न झाल्यामुळे सदर शिक्षक वर अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याने दिनांक 25 ऑगस्ट रोजी शाळा शिक्षण समिती, ग्रामस्थ तसेच बिरसा क्रांती दल ने मदयपी शिक्षक मुंडे यांची त्वरित बदली न झाल्यास पंचायत समिती समोर उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी निवेदन देऊन करण्यात आला असून निवेदन गटशिक्षणाधिकारी यांच्यसह प्रतिलिपी मा. नरहरी झिरवळ, शिक्षणमंत्री म. रा. मुंबई, आमदार नितीन देशमूख यांच्या सह अनेकांना पाठविण्यात आल्या असून निवेदन वर विष्णू डाबेराव अर्चना डाबेराव, रामचंद्र लोखंडे, नवनाथ पवार, रामा भाऊ करवते उपसभापती पंचायत समिती पातुर इमरान खान आदी. च्या सह अनेकांच्या स्वाक्षरी आहे.