Wardha Farmer : वर्धाच्या उमरी येथील रोठा गावातील शेतकर्याने संतप्त होऊन कपासीच्या गाडीला आग लाऊन ती पेटविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र जिनिंग मधील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने लागलेली आग वीजवण्यात आली. अमोल ठाकरे राहणार रोठा असे कापूस पेटवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आग लावण्याचे प्राथमिककारण, घटनेच्या सकाळी दहा वाजता पासून शेतकऱ्याने कापूस विक्रीसाठी आणला होता. मात्र, तांत्रिक अडचण सांगून कापूस विक्रीची शक्यता नसल्याने संतप्त होतं शेतकऱ्याने कापूस पेटवण्याचा प्रयत्न केला. जिनमधील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने आग विझवण्यात आली. सीसीआयची खरेदी सुरू असताना शेतकऱ्यांच्या सातबारा मध्ये 2023-24 मध्ये पेरा नोंदणी नसल्याने खरेदी केला नव्हता शेतकऱ्याचा कापूस त्यामुळे शेतकरी अमोल ठाकरे रा. रोठा याने कापूस पेटवण्याचा प्रयत्न केला. ही घटना वर्धेच्या उमरी येथील जिनामध्ये दि 8 फेब्रुवारी रोजी घडली. मात्र या घटनेचा video मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.