Friday, July 12, 2024
spot_img
Homeराज्यवाटे हळूहळू चाला, मुखाने जय जय श्रीराम बोला..!

वाटे हळूहळू चाला, मुखाने जय जय श्रीराम बोला..!

रामटेक – राजु कापसे

मुखात रामनामाचा गजर, पायांना रामनगरीची ओढ, तळपत्या सूर्याची पर्वा न करता मध्यप्रदेशातील चमत्कारिक श्री हनुमान मंदिर संस्थान जामसावळी ते रामटेकचे अंतर मजलदरमजल कापत भव्य पदयाञा श्रीरामप्रभूंची पालखीसह वारी रामटेकच्या दिशेने प्रस्थान दिंडी करीत असल्याचे रामभक्तीने ओतप्रोत भरलेले दृश्य मनात भक्तीची भावना निर्माण करणारे होते.

दरवर्षी प्रमाणे यंदाही वंसत पंचमी दिनानिमित्त पाच दिवसीय जामसावळी ते श्री क्षेत्र गडमंदिर रामटेक पायदळ दिंडी यात्रा दि. १४ फेब्रुवारी ला सकाळी श्री राम मूर्तीचा अभिषेक व विधिवत पूजन करून दिंडी पालखी यात्रा रामनामाचा गजर करत रामटेककडे उत्साहात निघाली. यात अनेक भजनी मंडळांचा सहभाग व दोनशेपेक्षा अधिक भाविक तल्लीन झाले होते. दिंडीत श्रीराम दरबार, पालखी, भगवे झेंडे हाती घेतलेले भाविक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

जामसावळी मधून मार्गक्रमण करत असताना गावात जागोजागी गावकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रांगोळी काढली होती. महिलांनी घराबाहेर येऊन पूजन व दर्शन घेतले. पालखी मंदिर संस्थांनाच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील महिला व पुरुष यात्रेत सहभागी झाले.

बजाज चौक जामसावळी पर्यंत आल्यानंतर त्यांनी पालखीचा निरोप घेतला. पारडसिंगा, केळवद, सावनेर, खापा, दहेगाव जोशी, करंभाळ, पारशिवनी आमडी,मनसर करत संध्याकाळी शितलवाडी येथे पालखी यात्रा मुक्कामी पोहचली. गजानन महाराज मंदिर संस्थान कडून गावच्या नागरिकांनी भव्य पदयाञेचे दणदणीत स्वागत केले. कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होते.

रविवारी सकाळी ९ वाजता पदयाञेचे रामटेककरिता प्रस्थान करीत बस स्टॅड, पिपलेश्र्वर हनुमान मंदिर, आंबेडकर चौक , रामाळेश्र्वर मंदिर , गांधी चौक, झेंडा चौक , तहसील मार्गक्रम करीत गडमंदिर रामटेक येथे पोहचली यावेळी रामटेक शहरामध्ये चौका – चौकात पालखीचे दर्शन करण्यात आले.

विविध चौकामध्ये पाणी व महाप्रसाद वितरीत करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक सुमीत कोठारी, श्रेयस जयस्वाल, विपुल मेंघरे , हर्ष कनोजे, अमोल गाळवे, शुभम आकरे सह शहरातील भाविक मोठ्याप्रमाणात पदयाञेत यात्रेत सहभाग आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: