Monday, December 23, 2024
Homeविविधस्वयंमसिद्धाची वाट…मोनिका उमक यांचा साथ…

स्वयंमसिद्धाची वाट…मोनिका उमक यांचा साथ…

“लाथ मारूनी आव्हानांना
गंध यशाचा धुंद करावा
मिठीत घ्यावी आपुली स्वप्ने
आयुष्याचा उत्सव व्हावा
तोच श्वास अन तीच हवा
पळ पळ भासो नित्य नवा
सजीव होण्या जिवंतपणा
आयुष्याचा उत्सव व्हावा
नको निराशा नकोत मोह
स्वतः स्वतःचा सोडू डोह
जगणे आपुले सार्थ कराया
आयुष्याचा उत्सव व्हावा
कष्ट करा, घाम गाळा
नष्ट होतील सारे ताण
उंच होईल तुमची मान
आयुष्याचा उत्सव छान”

ह्या ओळी प्रमाणे साक्षात जगत असलेली उद्योग उभारणी क्षेत्रात नावारूपाला आलेल हे व्यक्तिमत्व अमरावती हिची जन्मभूमी नसताना अमरावतीला कर्मभूमी बनवलं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध केल्. बायकांचे नेहमी असंच असतं लग्न झाल्यानंतर माहेर सोडून जेव्हा सासरी येते तेव्हा तेथील व्यक्ती, अनुभव ,शहर ,सर्व वेगळ असतं आणि त्यात प्रत्येकाचे नातं जोडावं लागतं.ते कुटुंबात असो वा समाजात ,नव्याने मित्र मैत्रिणी जोडावे लागतात.अहो स्वतःला सिद्ध करावं लागतं! आणि हे सर्व करून दाखवलं ते प्राध्यापिका मोनिका आशिष उमक यांनी. ती म्हणते…. आपली परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारावी पण ती आपल्याला जशी हवी तशी बनवावी….

खरंच या प्रमाणेच तिने स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानाला सिद्ध करून दाखवलं. स्वयंसिद्धा म्हणजेच प्रा. मोनिका उमक आणि प्रा. मोनिका उमक म्हणजेच स्वयंसिद्धा अशीच ओळख आता सर्वदूर पसरली आहे. हे अभियान सध्या अमरावती शहराची शान झालेला आहे. अमरावतीचा वा सोबतच संपूर्ण विदर्भाचा विकास हेच ध्येय मनाशी बाळगून प्रा. मोनिका उमक ह्या अविरत झटत आहेत. हे अभियान कागदावर नसून साक्षात असं आहे.

असं साक्षात अभियान तिने उभं केलं. या अभियानाची सुरुवात माननीय श्री किरण भाऊ पातुरकर यांच्या प्रेरणेतून झाली. भाऊंच स्वप्न म्हणजे तळागाळातील प्रत्येक महिला, युवकांना उद्योजक झालेलं पाहणं. ते म्हणतात ” रोजगार मागणारे होण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा” हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. ‘उद्योजक बनवूया उद्योजक घडवूया ‘ या तत्वाने अभियान आज नावारूपाला आलेल् दिसून येते.

अमरावतीमध्ये एम आय डी सी इंडस्ट्रियल असोसिएशन 12 मार्च 2018 ला उद्योजक महिलांचा सत्कार मोठ्या प्रमाणात घेतला होता आणि तेव्हाच स्वयंसिद्धा अभियानाची घोषणा केल्या गेली. हे अभियान तेव्हापासून सुरू झाले ते आज रोजी एवढ्या स्वरूपात विस्तारल्या गेलेले दिसून येते. त्यात प्रा. मोनिका उमक यांचा सिंहाचा वाटा आहे. या छोट्याशा काळात या अभियानातून 5000 उद्योजकांना उद्योजकबनवण्याचे मार्ग दिले त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे धडे दिले गेले.

यामध्ये शंभर महिलांचे उद्योग आज रोजी सुरू झालेले आहेत. तर 45 महिला उद्योजक ज्यांना त्यांच्याच उद्योगामुळे प्रसिद्धीचे व्यासपीठ या स्वयंसिद्धाने न्याय मिळवून दिले, आणि त्यांच्यासाठी समृद्धी साधने बनविली आणि पुन्हा अशा यशस्वी महिलांचा सत्कार 8 मार्च 2020 रोजी करण्यात आला या सर्वांचे सूत्र सांभाळणारी सर्वांना एक सूत्रात बांधून ठेवणारी जिच्या एका शब्दात काम होतात आणि तिने टाकलेला शब्द कधी वाया जाणार नाही आशी ती प्रा. मोनिका उमक. हेही तेवढंच महत्त्वाचं तिच्या शब्दांची धार कधी बोथट होणार नाही या व्यक्तिमत्वाला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणावं लागेल.

तिचं कुटुंब, दोन मुलं ,घर मैत्रिणी आणि स्वतःची आवड जोपासून आणि त्यात सतत हसतमुख राहणारी ही एक आधाराचं वटवृक्ष म्हणावं लागेल हिला प्रत्येकाची जाण आहे म्हणजे, ‘ नकोस मी आहे ना! ‘थांबू नकोस मी करते ना! हेच तिचं वाक्य आपल्याला ऐकायला मिळते ती म्हणते मनातील स्वप्ने खूप मोठी असावी ती पूर्ण करण्याची कारणं मात्र नसावी.

अशीही मोनिका उमक तुला पुढील आयुष्यात खूप यश मिलो तुझ्यामुळे कोणाच्या घरात जर चुल पेटत असेल ,कोणाचा हरवलेला स्वाभिमान परत मिळत असेल, तुझ्यामुळे उद्योग क्षेत्रात महिलांना मानाचे स्थान मिळत असेल तर त्याचा आनंद सर्वांनाच आहे खरच तुला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्त्रीयांना आपलं अस्तित्व जगवायचं असेल तर, “आर्थिक दृष्टीकोनातून सक्षम होणे” याची आज नितांत गरज आहे आणि तेवढच गरजेचं, त्यासाठी गंभीरतेने प्रयत्न करणे. चला स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान आपल्या पाठीशी आहे, उद्योजक बनू या उद्योजक घडवूया… स्वयंसिद्धा ला लाभलेले कीर्ती आणि अनेक गरजू स्त्रियांना दिलेला मदतीचा हात. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य. हेच मोनिका यांचं कमावलेलं साधन आहेत. असे त्या म्हणतात.

लेखिका – सौ. जयश्री गुंबळे, जयश्री पिकल्स गृहउद्योग, सहसचिव स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: