VVIP : देशासाठी आधी युद्धाच्या मैदानात जीवाची बाजी लावणारे शूर माजी सैनिक आता राजकीय मैदानात उतरणार आहेत. त्यांनी वीरो के वीर इंडियन पार्टीची VVIP स्थापना केली असून सरकारच्या मनमानी व हुकूमशाही पद्धतीमुळे सैनिक अवघ्या देशात आपले उमेदवार उभे करणार असल्याचे समोर आले आहे.
आजपर्यंत त्यांनी देशाच्या बाहेरील शत्रू विरुद्ध लढून त्यांना धूळ चारली. आता सेनेतून निवृत्त झाल्यानंतर त्यापेक्षाही देशाला घातक असलेल्या सरकारच्या जनतेला त्रस्त करण्याच्या धोरणामुळे त्यांनी लोकसभे मार्फत राजकीय रिंगणात उडी घेतली आहे. विशाल भारताच्या 28 राज्यातून व 8 केंद्रशासित प्रदेशातून 15 हजारापेक्षा जास्त सक्रिय कार्यकर्ते कुटुंब ॲप मार्फत जुळऊन वीरो के वीर इंडियन पार्टी VVIP. नावाची संस्था स्थापन करून नोंदणी केली आहे.
तर अकोला लोकसभा मतदार संघातून रामभाऊ खराटे पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. ते वाशीम जिल्ह्याच्या केनवड ता. रिसोड (पूर्वीचा अकोला) येथील मुल रहिवाशी असून त्यांनी 17 वर्षे सीमेवर सेवा बजावली. बर्फात -12 डिग्री व वाळवंट 50 डिग्री मधे निष्ठेने मेहनतीने, इमानदारीने देशाची सेवा केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 21 वर्षे एमपीएससी मार्फत PSI, API,PI पोलीस दलात सेवा दिली आहे. सध्या ते LLB, LLM , करून न्यायदानाचे काम व PHD करत आहेत. त्यांची मुले व सूना MBBS आहेत.
जनतेलाही ते यशस्वी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बोदर पटेल हे सुरतचे असून त्यांना ह्याबाबत वर्ल्ड रेकॉर्ड चे अवॉर्ड दि.28 ऑक्टो 2023 ल मिळाले आहे. त्यांनी 26 ते 28 हे सर्व सैनिक सुरत येथे एकत्र करून त्यांना मार्गदर्शन केले आहे.