Monday, December 23, 2024
Homeग्रामीणराज्यातील या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात...हजारो उमेदवार मैदानात

राज्यातील या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात…हजारो उमेदवार मैदानात

आज रविवार रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी हजारो उमेदवार मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येनं आहेत.

राज्यातील या जिल्ह्यात होत आहे मतदान…अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: