आकोट – संजय आठवले
भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आकोट व तेल्हारा तालुक्यातील मतदार यादी ऑनलाईन पद्धतीने तयार करण्यात आली असून दोन्ही तालुक्यातील मतदारांनी या यादीमध्ये आपली नावे तपासून घ्यावीत. सोबतच आपल्या मतदान ओळखपत्राशी आपल्या आधार कार्ड ची जोडणी करून घ्यावी. असे आवाहन उपविभागीय अधिकारी आकोट श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
भारत निवडणुक आयोगाचे निर्देशाप्रमाणे दिनांक ०५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. दिनांक ०५ जानेवारी २०२२ पासून पुर्णतः ऑनलाईन मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यामध्ये बहुतांश मतदारांची नविन नावे समाविष्ट करण्यात आलीत, काही मतदारांचे नावे वगळण्यात आली, काही मतदारांचे मतदार यादीतील तपशिल दुरुस्त केले, काहीचे नावे याच विधानसभा मतदार संघातील एका यादी भागातून दुस-या यादी भागामध्ये स्थलांतरीत करण्यात आली आहेत.
या सर्व अर्जावर या कार्यालयातुन सखोल चौकशी करुन भारत निवडणुक आयोग यांचेकडुन प्राप्त सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे आकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा कसे व असलेले नाव व इतर तपशिल हा योग्य असल्याबाबतची खातरजमा ही मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे https://ceoelection.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देवून करावी.
तसेच नाव आढळून न आल्यास nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईल किंवा आपले रहीवासी पत्याचे मतदान केन्द्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालय, आकोट किंवा तेल्हारा येथे प्रत्यक्ष भेट देवून आपल्या शंकेचे निराकरण करुन घ्यावे. जणेकरुन आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वेळेवर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही.
या सोबतच मतदारांनी आपले मतदान ओळखपत्राला आपले आधारकार्ड जोडणी ही Voter Helpling App. nvsp.in या संकेतस्थळावर जावून नमुना ६४ भरुन घरबसल्या ऑनलाईन स्वरुपात करावी किंवा आपले घरी या कार्यालयातुन नियुक्त करण्यात आलेले मतदान केन्द्रस्तरीय अधिकारी आले असता त्यांना आपला आधारकार्ड क्रमांक निःसंकोचपणे देवून करुन घ्यावी व लोकशाही बळकटीकरण करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.