Monday, December 23, 2024
Homeराज्यलोकशाही मार्गाने ठरणार व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्राचे शिलेदार !...22 सप्टेंबरला होईल ऑनलाईन...

लोकशाही मार्गाने ठरणार व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्राचे शिलेदार !…22 सप्टेंबरला होईल ऑनलाईन मतदान

प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्ष यांची होणार निवड

राजु कापसे प्रतिनिधी

नागपूर : देशभरासह जगातील ४३ देशांमध्ये संघटन असलेल्या सर्वात मोठ्या या संघटनेची महाराष्ट्राची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने २२ सप्टेंबरला ठरणार आहे. ऑनलाइन पद्धतीने राज्यभरातील पत्रकारांना या निवडणुकीच्या माध्यमातून योग्य नेतृत्वाला पसंती देण्याची या निमित्ताने ऑनलाईन संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवडणूक कार्यक्रम २०२४-२५ साठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लोकशाही मार्गाने म्हणजेच निवडणुकीतून पूर्ण होणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष, ३ कार्याध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, ६ विभागीय अध्यक्ष इत्यादी पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १३ ते १५ या दरम्यान संघटनेत दोन वर्ष चांगले काम करणाऱ्या आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या इचुक उमेदवारा कडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आलेल्या अर्जाची छाननी होईल. त्या अर्जातून १३ उमेदवार आपले नशीब आजमावतील. अनुक्रमे एक नंबरचे मतदान ज्या पदाधिकारी यांना होईल त्याला त्या प्रमाणे पद देण्यात येईल. दि.२१ सप्टेंबर,२०२४ पर्यंत प्रचारासाठी दहा दिवसांचा वेळ मिळेल.

दि.२२ सप्टेंबर,२०२४ ला मतदान होईल.
निवडणुकीचा निकाल दि.२३ सप्टेंबर,२०२४ रोजी जाहीर करण्यात येईल. सर्व पदाधिकाऱ्यांचा दि.२९ सप्टेंबर,२०२४ रोजी पदग्रहण व सत्कार संपन्न होईल. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड.संजीवकुमार कलकोरी व सी. ए. सुरेश शेळके हे काम पाहतील. त्यांचा निर्णय अंतीम निर्णय असेल.

अशी असेल मतदान प्रक्रिया

मतदान हे ईमेल द्वारे होणार आहे. मतदान करण्याचा अधिकार राज्यकार्यकारणी पदाधिकारी, सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, महानगर अध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष, यांना असेल. स्वतः च्या मेल आयडी वरून खालील प्रमाणे आपण मतदान करायचे आहे. विषयामध्ये : “राज्य पदाधिकारी निवडणूक कार्यक्रम २०२४ माझे मतदान” असे लिहायचे आहे. त्यानंतर मुख्य मेसेजमध्ये स्वतः चे नाव, जिल्ह्याचे नाव, व्हॉईस ऑफ मीडिया मधील पद, मोबाईल नंबर माझे मतदान…. यांना आहे.
असा मजकूर लिहून सदर मेल [email protected] या मेल आयडीवर दि.२२ रोजी सकाळी ९.०० ते ७.०० यावेळेमध्येच पाठवायचा आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: