‘व्हाँइस आँफ मिडीया ‘ ही संघटना आता देशात १ नंबर‘
रामटेक – राजु कापसे
‘व्हॉइस ऑफ मीडिया’ला ‘इंडिया बुक रेकार्ड’ ने देशातली पत्रकारांची नंबर वन संघटना, संस्था म्हणून गौरवले आहे. आता ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ३७ हजार ६०० पत्रकार सदस्य असलेली संघटना आहे.
याच निमिताने ‘आनंदीमय’ एक छोटेखाणी कार्यक्रम मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या हॉटेल सम्राट ‘उमंग’ सभागृह येथे पार पडला. यावेळी मंगल प्रभात लोढा (पर्यटन मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय) खा. हेमंत पाटील (खासदार हिंगोली लोकसभा) मनोजकुमार शर्मा (वरिष्ठ आय. पी. एस. अधिकारी),
विनायक पातृडकर (ज्येष्ठ संपादक तथा मुख्यमंत्री यांचे माध्यम सचिव) रविकांत तुपकर (नेते शेतकरी संघटना) डॉ. प्रदीप महाजन (ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय वैदकीय तज्ञ) चंद्रमोहन पुपाला (राष्ट्रीय सरचिटणीस ‘व्हॉइस ऑफ मीडिया’) धर्मेंद्र जोरे (राष्ट्रीय उपाध्यक्ष ‘व्हॉइस ऑफ मीडिया’) अनिल म्हस्के ( महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ‘व्हॉइस ऑफ मीडिया’) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
व्हॉइस ऑफ मीडिया’ नंबर वन नामांकन पत्राचे, विमोचन आणि मेडल प्रदान यावेळी करण्यात आले. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी भाषणे यावेळी झाली. या कार्यक्रमासाठी देशातून प्रमुख असणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ च्या पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती.