Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीVivek Bindra | मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल...

Vivek Bindra | मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल…

Vivek Bindra : ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ विवेक बिंद्रा (Vivek Bindra) विरोधात नोएडाच्या सेक्टर-126 पोलीस ठाण्यात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, विवेक बिंद्राविरुद्ध त्याची पत्नी यानिका बिंद्राचा (Yanika Bindra) भाऊ वैभव क्वात्रा (Vaibhav Kwatra) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, विवेक बिंद्राने यानिकाला मारहाण केली. मारहाणीनंतर यानिकावर अनेक दिवस दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यानिकाच्या शरीरावर खोल जखमा आहेत.

ही घटना नोएडाच्या सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सीमध्ये घडली, जिथे तो राहतो. 7 डिसेंबरला सकाळी बिंद्रा आणि त्याची आई प्रभा यांच्यात जोरदार वाद झाला. यानिका मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली असता बिंद्राने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात यानिकाला दुखापत झाल्याची माहिती आहे.

एफआयआरनुसार, बिंद्राने कथितरित्या यानिकाला एका खोलीत नेले, तिचे केस ओढले आणि तिच्यावर हल्ला केला. बिंद्राने त्याचा फोनही तोडला. यानिकाला एवढी मारहाण करण्यात आली की तिच्या कानाचा पडदाही फाटला, असा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

बिंद्रा हे बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड (BBPL) चे CEO आहेत आणि त्यांना YouTube आणि Instagram वर लाखो लोक फॉलो करतात. अलीकडेच, YouTuber संदीप माहेश्वरीने त्याच्या YouTube चॅनेलवर “बिग स्कॅम एक्सपोज” नावाचा व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी बिंद्राच्या कंपनीकडून फसवणूक झाल्याचा दावा केला होता. मात्र, बिंद्राने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: