खामगाव – हेमंत जाधव
माननीय जिल्हाधिकारी श्री किरण पाटील साहेब यांचे बाबुराव शेठ लोखंडकार यांच्या निवासस्थानी लोखंडा येथे सदिच्छा भेट ह्यावेळी खामगाव विधानसभे चे लोकप्रिय आमदार श्री आकाश दादा फुंडकर हे प्रमुख उपस्थित होते श्री. बाबुराव शेठ लोखंडकार यांनी दोन्ही मान्यवर यांचे स्वागत केले तसेच शिवशंकर लोखंडकार अध्यक्ष खरेदी विक्री संस्था खामगाव व मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार ग्रामपंचायतचे सदस्य प्रतीक जी लोखंडकार यांनी लोखंडकार परिवाराच्या वतीने श्री अतुल जी पाटोळे तहसीलदार साहेब व ग्राम विकास अधिकारी श्री चंदनसिंह राजपूत साहेब श्री अभय जी कुलकर्णी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कैलास चौधरी मान्यवरांना शाल श्रीफळ बुके देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला यावेळी विठ्ठल रावजी लोखंडकार यांनी परीसरातील प्रमुख समस्याकडे लक्ष केंद्रित केले जिगाव प्रकल्पाचे पाणी लोखंडा व आजूबाजूच्या पंचक्रोशीत आले पाहिजे आमच्या परिसरात सहा ते सात गाव सगळीकडूनच पाण्यापासून वंचित आहेत म्हणून जिल्ह्याचे पालक म्हणून आपण आहात.
या परिसरातील सर्व ग्रामपंचायतचे ठराव माननीय आमदार साहेबांच्या मार्फत आपणाकडे घेऊन येऊ व आपण जिगाव प्रकल्पाचे अधिक्षक इंजिनिअर श्रीराम हजारे यांच्यासमवेत बैठक लावून वंचित गावांचा समावेश ओलीतााली क्षेत्र घेन्यात यावे वचीत क्षेत्राला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून बैठक व्हावी अशी विनंती केली आहे.
परिसरातील घारोड. निरोळ .लोखंडा .शिराळा. पाळा. नाय देवी.उंबरा अकोली खेर्डी जळका तेली किन्ही महादेव नागापुर गणेशपुर वझर झोडगा परिसर जिगाव प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी या गावांना मिळावे करिता सन्माननीय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनात पंचक्रोशी च्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष बाब म्हणून लक्ष देण्यासंदर्भात आग्रही विनंती केली.
गावाच्या सरपंच सौ दुर्गाताई ठाकरे उपसरपंच श्री सुरज हिवराडे श्री विलास भागवत श्री सिद्धार्थ हिवराळे सौ पूजा प्रमोद पुंडे सौ रेखाताई विनोद पाटोळे प्रतिष्ठित श्रीकृष्ण ठाकरे नागरिक श्री गोविंदराव आटोळे श्री गजानन वानखेडे श्री विनोद तांबडे श्री अनिल भाऊ लोखंडकार श्री शाम भाऊ टिकार श्री राम कृष्ण लोखंडकर श्री दत्तू भाऊ श्री मदन गाढवे श्री निखिल वानखेडे लोखंडकार श्री नितीन देशमुख श्री नारायण खेडेकर तलाठी श्री खरात साहेब ग्रामसेवक श्री सागर जाधव श्री.सदाभाऊ मडावी ईतर मान्यवर उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.