मुंबई – गणेश तळेकर
आषाढी एकादशी च्या दिवशी “विठ्ठल पावला” , दिनांक : २९ -६-२०२३ रोजी केली घोषणा..! ” मा. श्री सुधीर मुनगंटीवार (वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या पर्णकुटी येथील कार्यालयात आज बालरंगभूमी परिषद कल्याणचे अध्यक्ष श्री.सतिश देसाई ( दिग्दर्शक ) यांनी चेतन दुर्वे ( अभिनेते ),
गणेश तळेकर ( अभिनेता ,कार्यकारी निर्माता ) राजीव रेवणकर ( लेखक , दिग्दर्शक ) , इशा कुलकर्णी (संस्कृत भारती) , रुपाली निंबाळकर (भाजप चित्रपट कामगार आघाडी सचिव ) यांच्यासह “संस्कृत अकादमी” पाहिल्यांदाच नवीन स्थापना करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला.
त्यावर मा.श्री.सुधीर मुनगंटीवार साहेबांनी त्याला लगेच हिरवा कंदील दाखवला व लगेच सुत्रांना कळवून ” संस्कृत अकादमी ” स्थापन करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर “संस्कृत अकादमी” साठी भरघोस निधी मंजूर करावा असे देखील सांगितले.
येत्या श्रावण पौर्णिमेला “संस्कृत दिनाचे” औचित्य साधून “संस्कृत अकादमी” स्थापन करण्यात यावी असे देखील आवर्जून सांगितले.आणि ‘सत्यं शोधं सुंदरम्’ या संस्कृत नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर करावे यासाठी देखील प्रस्ताव मांडण्यात आला.
तसेच यावर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ” शिवराज्याभिषेकाला ” 350 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यासाठी श्री रमेश करमरकर लिखित छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटकाचे प्रयोग वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी व्हावेत व त्यासाठी नाट्यगृहे उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती करण्यात आली.
लहान मुलांवर मोबाईलचा पगडा खूप आहे तो दूर करून छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या भारावलेल्या जीवनपटाची ओळख करून देऊन त्यांच्यात राष्ट्राभिमान, देशप्रेम जागृत करणे ही काळाची गरज आहे. म्हणून जनजागृतीसाठी अशा तऱ्हेचे नाट्यप्रयोग सर्वदूर होणे आवश्यक आहे तरी यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.