Monday, July 22, 2024
spot_img
Homeराज्य"आपला आमदार आपल्या गावी" उपक्रमा अंतर्गत घाटपेंढरी गावाला भेट...

“आपला आमदार आपल्या गावी” उपक्रमा अंतर्गत घाटपेंढरी गावाला भेट…

राजू कापसे

पारशिवनी – “आपला.आमदार आपल्या गावी ” या उपक्रमाच्या माध्यमातून रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दि.२१ जुन २०२४ रोजी पारशिवनी तालुक्यातील आदिवासी बहुल अतिदुर्गम भागातील घाटपेंढरी गावाला भेट दिली. यावेळी तहसिलदार राजेश भांडारकर, आदिवासी प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर, शिवसेना वैद्यकीय जिल्हा प्रमुख गौरव पनवेलकर,गट विकास अधिकारी जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष दिपक शिवरकर,शिवसेना उप तालुका प्रमुख प्रेम भोंडेकर,

ग्राम पंचायत सरपंच रामकलीताई उरमाले,समाजसेवक विठ्ठल पाटील, उपसरपंच अशोक कोडवते, पोलीस पाटील देशमुख, जि.प. बांधकाम अभियंता भोयर, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विशेष प्रकल्प सुभाष अल्लेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी आशीर्वाद नागपूरकर, तालुका कृषी अधिकारी शेंडे, उपविभागीय विद्युत विभागाचे मानमोडे, यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी घाटपेंढरी गावात गेल्यानंतर आमदार आशिष जयस्वाल तेथील गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यात रेशन कार्डबाबत- ३२ , विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्याकरिता प्राप्त- ३२ , घरकूलाचा लाभ मिळण्याकरिता प्राप्त- १०९, मतदार नोंदणसाठी-१३, बांधकाम कामगार नोंदणी करिता प्राप्त- ६५,जवाहर विहीर करिता- ३, ई श्रम ३, मध्यवर्तिय अर्थसंकलापातून श्रमती फुलावांती मसराम यांना किराणा दुकान,श्री.राजकुमार मरस्कोल्हे मासे पकडण्यासाठी जाळे, अंगणवाडी विद्युत मीटर देणे,

तोतलाडोह ते घाटपेंढरी ररस्त्याचे काम सुरू करणे, सालईटोला मंजुर रस्त्यांचे काम सुरू करणे, कु.चांपा श्रीराम चौधरी दिव्यांग असून तिच्या घरी जाऊन तिचे आधर कार्ड बनवून देणे,श्री. रामकृष्ण ईनवाते यांना विद्युत रोहित्र देणे आदी समस्या गावकऱ्यांनी मांडल्यावर आमदार जयस्वाल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगून यांची कामे कशी तातडीने होतील यासंदर्भात निर्देश दिले.

यावेळी केशव ईडपाची, विजय कुंभरे,कलिराम उईके,कृष्णकुमार ईडपाची,शासकीय आश्रम शाळा अधिक्षक चुटे सर,विजय भुते,ललित घंगारे,उत्तम वडस्कर,राहुल ढगे, टिकाराम परतेती,रोशन पिंपरामुळे, आशिष धोटे,मंगलसिंग उरमाले,मनराज इंनवाते, दिलीप परतेती, संजय धूर्वे, शिवपाल उईके,अनिल कुंभरे, सह गावकरी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: