हेमंत जाधव
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागणीबाबत सर्व मागण्या पूर्ण करण्याबाबत आझाद मैदानावरील दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ पासून चालू असलेल्या आंदोलनाला अस्तित्व संघटनेने पाठींबा दिला आहे.
त्यांची “प्रमुख मागणी – शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे”, जेणेकरून असंख्य कर्मचारी बेरोजगार होणार नाहीत, मुलांचे शिक्षण, व्यवसायासाठी काढलेले कर्ज आणि अनेक आर्थिक अडचणी यांचा सामना त्यांना करावा लागणार नाही.
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेला शासनाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे अभियानात सहभागी झालेल्या ८४ लक्ष कुटुंबांच्या वतीने स्थगित केलेले बेमुदत धरणे आंदोलन हे गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजीपासून संविधानिक मार्गाने संप सुरु केले असून असहकार आंदोलन खालीलप्रमाणे सुरु केले आहे.
- गावस्तरावर – २५ सप्टेंबर पासून ग्रामसंघ ठराव, प्रभागसंघ ठराव, महिला ग्रामसभा ठराव, ग्रामसभा ठराव व प्रभात फेरी / उमेद मागणी जनजागृती नवरात्र जागर फेरी / उमेद दिंडी
- तालुका स्तरावर – ०२ ऑक्टोबर – गांधी जयंती निमित्त- उमेद संघटना प्रभातफेरी, अधिवेशन तथा संघटना मागणीबाबत जनजागृती महामेळावा
- जिल्हा स्तर -२६ सप्टेंबर पासून – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेद संघटना प्रभातफेरी, आमरण साखळी उपोषण
- राज्य स्तर – ०५ ऑक्टोबर – उमेद संघटना प्रभातफेरी, अधिवेशन तथा संघटना मागणीबाबत जनजागृती महामेळावा
त्यांची मागणी पूर्ततेचा शासन निर्णय दिनांक दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजीपर्यंत काढून अंमलबजावणी आदेश निर्गमित करावा. जेणेकरून सदरचे आंदोलन व संप स्थगित करण्याचा निर्णय राज्य संघटनेला घेनेस मदत होईल.
“अस्तित्व संघटने”च्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रेमलता सोनोने यांनी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागणीसाठी चालू असलेल्या त्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठींबा दिला आहे. तरी त्यांची प्रमुख मागणी पूर्ण करून त्यांना न्याय मिळवून द्यावा असे सौ. प्रेमलता सोनोने यांनी आझाद मैदान, मुंबई येथे अस्तित्व संघटनेचा पाठिंबा असल्याचे पत्र देऊन आंदोलनात सहभाग नोंदविला.