Thursday, July 18, 2024
spot_img
Homeराज्यसत्यशोधक चित्रपटात लहुजी साळवेची भूमिका साकारणारे विश्वकर्मा उद्या अकोल्यात…

सत्यशोधक चित्रपटात लहुजी साळवेची भूमिका साकारणारे विश्वकर्मा उद्या अकोल्यात…

प्रत्येकाने बघावा असा प्रेरणादायी चित्रपट…

दिनांक 5 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला सत्यशोधक चित्रपट होय… बालगोपालांपासून ते आजी आजोबांनी बघावा असा हा चित्रपट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा माहितीपट नाही तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनातील चढ उतार, सुख दुःखाचे क्षण आणि भावभावनांची खूप सुंदर गुंफण यामध्ये झाली आहे. ज्योतिबांच्या भूमिकेत संदिप कुळकर्णी यांनी आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे स्वतः ला पूर्णतः झोकुन दिले आहे.

ज्योतिबांच्या काळात समाजव्यवस्था अत्यंत कर्मठ होती. शिक्षणापासून अस्पृश्य कोसो दूर होते. मुलींना तर कोणतेच स्वातंत्र्य नव्हते. अशा परिस्थितीत ज्योतिबांनी मिशनरी शाळेत शिक्षण घेतले. शिक्षणानेच शोषितांचे भले होऊ शकते हे तरुण वयातच त्यांनी ताडले आणि त्यांनी गोरगरीबांच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली.

कर्मठ समाजाकडून पदोपदी विरोध, अपमान सहन केला. पत्नी सावित्रीबाई ह्यांना स्वतः शिकवले आणि त्यांच्याही हाती लेखणी देऊन मुलींना शिकविण्याची जबाबदारी टाकली. ज्या काळात मुलींनी शिकणे म्हणजे पाप आणि शिकवणे हे तर महापाप समजले जाई त्या काळात सावित्रीबाईनी ही जबाबदारी खंबीरपणे पेलली. कर्मठ समाजाने फेकून मारलेले च शेण, चिखल, दगडगोटे सहन करत त्यांनी ज्योतिबांना समर्थ साथ दिली. दोघांना घरदार सोडावे लागले पण ते ध्येयापासून मागे हटले नाही.

हे सगळे दाखवत असताना चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. दोघांच्या जीवनातील मोजके पण प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारे प्रसंग चित्रपटात दाखवले आहेत. ह्या प्रसंगांशी प्रेक्षक इतके एकरूप होतात की अधून मधुन प्रत्यकाचे डोळे पाणावतात.
क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांची दमदार एन्ट्री प्रत्येकाला भावली. त्यानंतर प्रत्येक वेळी लहुजी दिसले तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्या वाजवून दाद दिली. लहूजींचे खंबीरपणे पाठीशी उभे असणे हे ज्योतीबांना हत्तीचे बळ देत होते.

चित्रपट बघून आल्यावर प्रेक्षकांना लहुजींचे जीवन चरित्र वाचण्याचा मोह आवरत नाही. सुरेश विश्वकर्मा हे लहुजींच्या भूमिकेत एकदम फिट बसले. असे विश्वकर्मा उस्मान शेख भूमिकेचे श्री तुकाराम बिडकर, दिग्दर्शक श्री निलेश जलामकर सह निर्माता राहुल वानखेडे व हर्षा तायडे दिनांक 14 जानेवारी 2023 ला आपल्या शहरात अकोला येथे वसंत टॉकीज येथे 3 वाजता मिराज येथे 4 वाजता येणार आहेत आपल्या सोबत हितगुज करायला तसेच अमरावती येथे राजलक्ष्मी येथे सायंकाळी 6 वाजता या चित्रपटाला IMDB (9.5/10)आणि इतर सर्व मोठ्या विश्लेषकांनी खूप चांगली रेटिंग दिली आहे.. ⭐⭐⭐⭐⭐ हा चित्रपट मी सहकुटुंब बघायला व आपल्या आवडत्या कलाकार…यांना आपणही नक्की बघा..

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: