प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कौशल्य प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न…
अकोला :- संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था पारस जिल्हा अकोला व मोसेक वर्क स्किल प्रा.लि.इंदोर यांच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना कौशल्य सन्मान प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही जात पात धर्म बाजूला करून कलेच्या माध्यमातून माणुसकी आणि मानवता शिकवत असल्याचे प्रतिपादन सांगलीचे युवा व्याख्याते आणि समाज प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे यांनी आपल्या चला आनंदाने जगूया व्याख्याना प्रसंगी केले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती साधली पाहिजे असे सांगून व्यसनाच्या आहारी न जाता स्वास्थ जपले पाहिजे तरच विश्वकर्मा योजना सफल होणार असल्याचे उपस्थित विश्वकर्मा कारागिरांना निक्षून सांगितले,प्रा.वसंत हंकारे यांनी भरगच्च हॉल मधील उपस्थित प्रशिक्षणार्थ्याना आपल्या अमोघ वाणी ने हास्यरसात मंत्रमुग्ध करून यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सादर केली,कौशल्य सन्मान प्रमाणपत्र वितरण सोहळ्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित असल्याने प्रमिलाताई ओक हॉल तुडुंब भरला होता,
कौशल्य विकास विभागाचे सह आयुक्त गणेश बीटोडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सोहळ्यात ,प्रा.वसंत हंकारे,सह आयुक्त गणेश बिटोडे,तहसीलदार सुरेश कव्हळे,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.पी.वानखडे प्रवीण भोटकर यांनी दीप प्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात केली.प्रशिक्षण केंद्राच्या ट्रेनर प्रा.शोभना गवई यांनी सुंदर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले,
संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण भोटकर यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण देताना येणाऱ्या अडचणी आणि योजनेची महती विषद केली.कौशल्य विकास विभागाचे सह आयुक्त गणेश बिटोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर यांच्या प्रामाणिक आणि निस्वार्थ कार्याचे कौतुक करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल प्रशिक्षण केंद्रातील ट्रेनर आणि प्रशिक्षनार्थ्यांचे आभार मानले.
यावेळी तहसिलदार सुरेश कव्हळे,जिला ग्रामोद्योग अधिकारी एस.पी.वानखडे, विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा समन्वयक पायल चौधरी,अण्णासाहेब पाटील विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक रोहित बारस्कर,मोसेक वर्क स्किल प्रा.ली.इंदोर चे राज्य समन्वयक शशिकांत केनेकर,विश्वकर्मा योजना समितीचे सदस्य जयंत मसने,कपिल खरप,राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा समन्वयक संदीप पाटील,प्रहार संघटनेचे मनोज पाटील तसेच संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप खंडारे,संस्थेच्या सचिव प्रा.प्रिया सातकर,सहसचिव हरेश तेलगोटे,
मार्गदर्शक धनराज लाहोळे,विजय गवई प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते,कार्यक्रमाचे बहारदार संचालन गजर महाराष्ट्राचा या न्यूज चॅनल च्या संचालिका नेहा गायकवाड यांनी केले तर आभार प्रशिक्षण केंद्राच्या ट्रेनर साक्षी वानखडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षण केंद्राचे ट्रेनर प्रा.नीलकंठ चव्हाण,प्रा.अक्षय इंगळे,प्रा.मोरेश्वर फाळके,प्रा.करण शिवणकर,निशांत निमकर्डे यांनी अथक परिश्रम घेतले.