रामटेक – राजु कापसे
विश्वगुरु भारत अभियान अंतर्गत द इनोवेटिव मोटीवेटर्स ग्रुप नागपुर तर्फे रामनगर चौक, नागपुर ते रामधाम तीर्थ मनसर पर्यंत रैली काढण्यात आली या रैलीचे समापन रामधाम तीर्थ मनसर येथे करून मा.श्री. चंद्रपालजी चौकसे (पर्यटक मित्र तथा संस्थापक रामधाम तीर्थ) यांनी रामधाम येथे सभेचे आयोजन करण्यात आले सभेत विश्वगुरु भारत अभियान अंतर्गत प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले नंतर राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या कु. गुंजन निलेश दमाहे, श्री. निलेश दमाहे ( विदर्भ चॅम्पियन व महिला कुस्ती कोच) व श्री. ईश्वर मेश्राम (युनिव्हर्सिटी चॅम्पियन व पंच महाराष्ट्र कुस्ती संघटना व कोच) यांचा श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने श्री. सत्येंद्र देशमुख (व्ही.एन.आय.टी. रजिस्ट्रार), श्री. अनंत तेलंग (इन्फ्रास्ट्रुक्टर कॉन्सलस्टंट), डॉ. रमा गोलवलकर (सिम्बायसिस पुणे व रायसोनी जनसंवाद विभाग HOD), सौ. रेणुका धवडगावकर (AG ऑफीस), कर्नल. श्री. अभय पटवर्धन (कारगिल योद्धा), श्री. रवींद्र हरदास नटराज (आर्ट कल्चरल सेंटर), श्री. प्रताप काशीकर (संयोजक विश्वगुरू भारत), श्री. संदेश कनोजे (अध्यक्ष भाजपा स्वच्छ भारत अभियान नागपुर),
श्री. पी.टी. रघुवंशी, श्री. राजेश भोंडेकर (सरपंच सालई), सौ. शारदाताई बर्वे, शोभाताई राऊत, कांचनताई माकडे, विमलताई नागपुरे, रंजनाताई मस्के, मोहन कोठेकर, मंगेश कठोते, रितेश कुमरे, मोहन कोठेकर, राजू कापसे, अजय मेहरकुळे, कैलास निघोट, अमोल खडोतकर, राहुल पिपरोदे, प्रशांत जांभुळकर, अशोक सारंगपुरे, सचिन चौरसिया, हर्षपाल मेश्राम उपस्थित होते.