सांगली – ज्योती मोरे.
घरात कोणी नसल्याचे पाहून घरात शिरूनपाण्याच्या मोटरीसह इतर साहित्याचा होणाऱ्या योगेश ईश्वर पाटील. वय 32 ,राहणार- आनंदपुर ,तालुका -अथनी,जिल्हा- विजापूर. सध्या राहणार- हरिपूर. यास
खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहत असलेल्या घरावर विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने विश्रामबाग परिसरात पाण्याची मोटर तसेच वायर चोरी केल्याचे कबुली दिली.
त्याच्याजवळ 22 हजार रुपये रोख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेढणे, 10 हजार रुपयाची कर्णफुले एक हजार रुपये किमतीची गॅस सिलेंडर टाकी,3000 हजार रुपये किमतीची स्टीलची भांडी, पाच हजार रुपयांची लक्ष्मी कंपनीची 3 एच पी मोटर पाच हजार रुपये किमतीची ,आणखीन 1 मोटर,4700 रुपयांचे किमतीचे 5 काळ्या रंगाच्या वायरचे गट्टे, 300 रुपये किमतीचे इलेक्ट्रिक मोटरचे 2 स्टार्टर पॅनल, 3000 हजार रुपयाची धातूची घंटा, 100 रुपयाचे वायर कापण्याचे कटर,
400 रुपयांची, 4 लहान घंटा, 26,200 रुपये रोख,3000 हजार रुपये, भारत गॅस कंपनीची टाकी 6000रुपयाची इंडियन गॅस कंपनीच्या दोन टाक्या असा एकूण 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आले.
सदरची कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, अनिल ऐनापुरे,आदिनाथ माने, विलास मुंडे, दरीबा बंडगर, संदीप घस्ते,मोहम्मद मुलाणी, भावना यादव यांनी पार पाडला. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दौलत कोळी करत आहेत.