खामगाव – हेमंत जाधव
आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतिने जगातिल पहिले दिव्यांग मंञालय स्थापन करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने आयोजीत केलेल्या ०६आॅक्टोबर २०२३ शुक्रवार रोजी बुलढाणा जिल्ह्या मध्ये शासन दिव्यांगाच्यादारी या मोहिमेच्या अनुशंगाने तेरा तालुक्यातिल सर्वे २१ प्रकारातिल दिव्यांग या मोहिमेत सहभागी बुलढाणा येथे होणार आहेत.
या मोहिमेतुन दिव्यांग हितार्थ होणार्या विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार असल्यामुळे तसेच जिल्ह्यातिल ८०%दिव्यांग निराधार असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे बुलढाणा जिल्हा शासन प्रशासनाने दिव्यांगांना मोफत येण्या जाण्याची प्रवास सोयी सह त्यांच्या खाण्या पिण्याची तजविज करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन आज मा.पालकमंञी गुलाबराव पाटिल व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना तहसिलदार श्री अतुल पाटोळे खामगाव यांच्या मार्फेत निवेदन सादर केले तर कार्यक्रम स्थळी व्हिल चेअर व आदी सामुग्रीची व्यवस्था करण्यात यावी तसेच या निवेदनावर काय कार्यवाही करण्यात आली ते कळविण्याची मेहरबानी करावी अशी मागणीही या निवेदनातुन करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती दिव्यांग हृदय सम्राट नामदार बच्चुभाऊ कडू अध्यक्ष दिव्यांग विभाग, भूमिपुत्र लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा युवा आमदार आकाश दादा फुंडकर खामगाव विधानसभा, धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड बुलढाणा विधानसभा यांना पाठविण्यात आल्या आहेत हे निवेदन देतेवेळी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक,
क्षञुघन ईंगळे,शेखर तायडे,लक्ष्मण कान्हेरकर,वसंत चिखलकर,विष्णु धोरण,परमेश्वर तिजारे,देविदास सोळंके,नींबाजी बाठे,विनोद पवार शांन्ताराम बाठे,मधुकर पाटील देविदास कल्याणकर प्रदिप वेरुळकर,विलास खराबे,कविता ईंगळे,मंगला आढाव,विनोद लांडे,ऊमेश देशमुख सुनिल निंबाळकर आदी दिव्यांगांच्या स्वाक्षर्या आहेत