Virat Kohli : आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 48 वे शतक झळकावून, विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडेत सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमाच्या जवळ येण्यास यश मिळविले आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत 49 वनडे शतके झळकावली आहेत. आता कोहली दोन शतके झळकावताच सचिन तेंडुलकरचा हा विश्वविक्रम मोडेल.
हा विक्रम मोडण्यापासून कोहली अद्याप २ शतके दूर असला तरी त्याने निश्चितच एक खास विक्रम मोडला आहे. खरंतर, विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 103 धावांची शानदार इनिंग खेळली होती, या खेळीदरम्यान कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार धावाही पूर्ण केल्या होत्या. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २६ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
असे करून कोहलीने अनेक दिग्गजांना पराभूत केले आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या 600 व्या आंतरराष्ट्रीय डावात 26 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याचबरोबर कोहलीने केवळ 567 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. म्हणजेच सचिनचा हा विक्रम मोडण्यात विराट कोहलीला यश आले आहे.
सर्वात जलद २६ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज
६२५ डाव – कुमार संगकारा
६२४ डाव – रिकी पाँटिंग
६०० डाव – सचिन तेंडुलकर
५६७ डाव – विराट कोहली
त्याचबरोबर कोहलीने विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना पहिले शतकही झळकावले आहे. कोहलीला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली चौथा फलंदाज ठरला आहे
कोहलीने आपल्या शतकी खेळीत श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेलाही मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. महेला जयवर्धनेने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 25957 धावा केल्या होत्या.
आता कोहली त्याच्या पुढे गेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत 34357 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
कुमार संगकारा या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. संगकाराने 28016 धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने आपल्या कारकिर्दीत 27483 धावा करण्याचा पराक्रम केला आहे. याशिवाय कोहली या बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.