Sunday, December 22, 2024
HomeBreaking NewsVirat Kohli | कोहलीने वानखेडेवर केला 'विराट' विक्रम…सचिनचा शतकाचा विक्रम मोडला…

Virat Kohli | कोहलीने वानखेडेवर केला ‘विराट’ विक्रम…सचिनचा शतकाचा विक्रम मोडला…

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 उपांत्य फेरीत इतिहास रचला आहे. विराटने सचिन तेंडूलकरचा सर्वाधिक 49 शतकाचा विश्वविक्रम मोडला असून 50 शतक ठोकणारा क्रिकेट विश्वातील पहिला खेळाडू बनला आहे. सोबतच एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

विशेष म्हणजे हा विक्रम मोडण्यासाठी विराटने मुंबईचे वानखेडे स्टेडियम, महान सचिनचे होम ग्राउंड आणि मास्टर ब्लास्टरच्या पदार्पणाची तारीख निवडली. सचिनने 34 वर्षांपूर्वी 15 नोव्हेंबर 1989 रोजी विरुद्धच्या कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

या विश्वचषकात विराट कोहलीने 674 धावा पूर्ण करताच विश्वविक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी 2003 च्या विश्वचषकात सचिनने 673 धावा केल्या होत्या, जो एक विश्वविक्रम होता, मात्र आता हा विश्वविक्रम विराटच्या नावावर झाला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन आहे, ज्याने 2007 विश्वचषकात 659 धावा केल्या होत्या, तर रोहित शर्मा 648 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. रोहितने 2019 मध्ये हा पराक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 2019 विश्वचषक स्पर्धेत 647 धावा केल्या होत्या. यासह रोहित विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 600 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.

या विश्वचषक स्पर्धेतच विराटने 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध 103 धावांची नाबाद खेळी खेळून सचिनच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. सध्या, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये भारतीय खेळाडू पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. या यादीत विराट कोहली पहिल्या, सचिन तेंडुलकर दुसऱ्या आणि रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: