Viral Video : हैदराबादच्या (Hyderabad) चंचलगुडा (Chanchalguda) भागात एका झोमॅटो डिलिव्हरी एजंट (Zomato Delivery Agent) ने अशी युक्ती काढली आहे की, लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तेल टँकर व्यापाऱ्यांच्या संपामुळे हैदराबाद शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीत जेवण वेळेवर पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी एजंटने घोड्यावर स्वार होण्याचा निर्णय घेतला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून व्हिडीओ पाहून त्यांना हसू आवरता येत नाही. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत.
ट्रकचालकांनी पुकारलेल्या वाहतूक संपामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर तेलाचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा स्थितीत तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. देशव्यापी निषेधामुळे इंधन टंचाईची भीती निर्माण झाली, त्यामुळे खरेदीत घबराट निर्माण झाली. मंगळवारी देशातील अनेक भागांतून अशी दृश्ये पाहायला मिळाली ज्यात पेट्रोल आणि डिझेल पंपांवर लोक इंधनाच्या तुटवड्यामुळे चिंतेत रांगेत उभे असल्याचे दिसले.
When petrol bunks ran out of fuel in #Hyderabad, @zomato delivery arrived on horseback … at Chanchalguda, next to Imperial Hotel… after long, long queues & closure of petrol pumps as a fallout of #TruckersStrike over #NewLaw on hit-and-run accidents @ndtv @ndtvindia pic.twitter.com/bYLT5BuvQh
— Uma Sudhir (@umasudhir) January 3, 2024
ट्रक चालकांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे मंगळवारी बस आणि ट्रक चालक रस्त्यांवरून बंद राहिले तर इंधन टंचाईच्या भीतीने अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर लोक जमा झाले. वाहनचालकांच्या आंदोलनामुळे मंगळवारी अनेक प्रवासी अडकून पडले होते.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी मंगळवारी सांगितले की, ‘हिट-अँड-रन’ प्रकरणांशी संबंधित नवीन दंडात्मक तरतूद लागू करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. गृहसचिव भल्ला यांनीही AIMTC आणि सर्व आंदोलक ट्रक चालकांना कामावर परतण्याचे आवाहन केले.