Sunday, December 22, 2024
HomeSocial TrendingViral Video | नवऱ्यासोबत भांडण करण्यासाठी महिला रस्त्याच्या मधोमध गाडीतून खाली उतरली…अचानक...

Viral Video | नवऱ्यासोबत भांडण करण्यासाठी महिला रस्त्याच्या मधोमध गाडीतून खाली उतरली…अचानक जंगलातून वाघ येतो आणि…घटनेचा धक्कादायक व्हिडिओ…

Viral Video – उन्हाळ्यात अनेकांना जंगल सफारी करायला जातात. सफारी करतांना लोकांनी जंगलाच्या मध्यभागी प्रवास करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे कारण ते कधीकधी धोकादायक ठरू शकते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे तुमची झोप उडणार. कारमधील एक महिला बीच हायवेवर खाली उतरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान जंगलातून एक वाघ येतो आणि महिलेला ओढून नेतो.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स हादरले आहेत. जंगलातून जाणार्‍या महामार्गावर गाडीतून उतरून महिला मोठी चूक करते, ज्याचा तिला फटका सहन करावा लागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान महिलेचे काय होते ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या मधोमध एक कार थांबली आहे. यानंतर एक महिला कारमधून खाली उतरते. ती मागे वळून गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाते. यादरम्यान ती बाहेर उभी राहते आणि कारमध्ये बसलेल्या व्यक्तीशी बोलू लागते.

महिलेच्या कारच्या मागे आणखी दोन गाड्या उभ्या असतात कदाचित या दोन्ही गाड्या मध्यभागी उभ्या असलेल्या महिलेची वाट पाहत असतील. दरम्यान, अचानक एक भयंकर वाघ तेथे दिसतो. लोकांना काही समजण्याआधीच त्या वाघाने त्या महिलेला पुढच्या दोन पायांनी पकडून झुडपात ओढले. हे पाहून गाडीत बसलेल्या लोकांची अवस्था बिकट होते. वाघ ज्या प्रकारे महिलेला ओढून नेत आहे, ते खूपच भयानक दिसत आहे. गाडीत बसलेले लोक महिलेला वाचवण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

Courtesy – @crazyclipsonly

Crazy Clips नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचे समजते काही लोक हा व्हिडीओ चीनमधला असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ पाहून एका यूजरने दावा केला की हा व्हिडिओ वाइल्डलाइफ सफारीचा आहे. युजरचा दावा आहे की ती महिला कारमधून बाहेर पडली कारण तिचं कारमध्ये बसलेल्या पतीसोबत भांडण झालं. ही चूक स्त्रीला भारी पडली आहे. वृत्तानुसार, जेव्हा तिचा नवरा आणि त्याची मुलगी महिलेला वाचवण्यासाठी कारमधून बाहेर आले तेव्हा वाघाने महिलेवर हल्ला केला आणि तिला ठार मारले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: