Viral Video : देशात नेता असो वा मोठा अधिकारी असो त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा वापर करतात. त्यात ते कधी कधी दिवसभर उपाशी पोटी आपली ड्युटी बजावतात मात्र काही मोठे अधिकारी त्यांना नोकराप्रमाणे वागणूक देवून छळ करतात. नुकतेच प्रकरण बिहार पोलिसांच्या एका महिला कॉन्स्टेबलच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाचा व्हायरल व्हिडीओ मागील कथा जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
प्रत्यक्षात एका कार्यक्रमात ड्युटीवर आल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या न्यायधीशांनी नाश्ता केला आणि नंतर महिला कॉन्स्टेबलकडून पिण्याच्या पाण्याची बाटली मागितली. न्यायधीशांनी पाणी मागताच लेडी कॉन्स्टेबलला राग आला.
त्याचवेळी मॅजिस्ट्रेटने नाश्ता केला आणि हवालदार भुकेने तहानलेल्या ड्युटी करत राहिल्याने महिला कॉन्स्टेबललाही राग आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लेडी कॉन्स्टेबल पुढे म्हणतेय की, ‘सर आपण नाश्ता केला पण आपल्या साथीदारांना विसरले. यावेळी, महिला कॉन्स्टेबलने पाणी आणण्यास नकार दिल्यानंतर इतर हवालदारांनीही तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
देखें वीडियो, पानी मांगने पर महिला सिपाही भिड़ी मजिस्ट्रेट से, आपके नौकर नहीं, सरकार के हैं…#BiharPolice #Bihar #BiharNews #बिहार_न्यूज़ #बिहार #LiveCities pic.twitter.com/reWzy3lHPr
— Live Cities (@Live_Cities) December 1, 2023