Saturday, July 13, 2024
spot_img
HomeSocial TrendingViral Video Vasai | भररस्त्यावर तो तिच्यावर सपासप वार करीत होता...वसईतील अंगावर...

Viral Video Vasai | भररस्त्यावर तो तिच्यावर सपासप वार करीत होता…वसईतील अंगावर शहारे आणणारा Video…

Viral Video Vasai : काल वसईमधील हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला, समोरचं दृश्य पाहून सगळ्यांनाच वाईट वाटत होतं, भीतीही वाटत होती. तो प्रियकर निर्दयीपणे प्रियसीवर लोखंडी पान्याने सपासप वार करीत होता मात्र तिला वाचवायला कोणाचेही धाडस झाले नाही, पण एक माणूस सोडला तर कोणीच त्या मुलीला वाचवायला पुढे धावलं नाही. सगळे नुसते मख्खपणे उभं राहून मृत्यूचं हे तांडव पहात होते. आरोपी युवक रोहितने मृत तरूणी आरती हिच्यावर वार केले आणि तिचा जीव गेला.

वसई पूर्व चिंचपाडा परिसरातकाल सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य नव्हे देशच हादरला आहे. आरोपीने प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पाना मारून तिची हत्या केली. तिचा जीव गेल्यावरही आरोपी तिच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि सतत ओरडत होता. तू माझ्यासोबत असं का केलंस, का केलं असं ? असा सवाल विचारत तो तिच्यावर ओरडत राहिला आणि पुन्हापुन्हा तिच्या डोक्यावर वार करत राहिला. मृत्यूचं हे तांडव दाखवणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, अनेकांनी त्याचं शूटिंग केलं पण एकानेही तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. कोणी मदतीसाठी पुढे आलं असतं तर कदाचित आज त्या तरूणीचा जीव वाचला असता. सध्या वाळीव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

का केली हत्या ?

अखेर हे निर्घृण हत्याकांड का घडलं, त्या आरोपीने तरूणीची हत्या का केली, यामागचं कारण आता स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. मृत तरुणी आणि तिची हत्या करणारा तिचा प्रियकर यांच्यात सातत्याने भांडण सुरु होतं. तरुणीचं दुसऱ्या कुणासोबत प्रेम प्रकरण सुरु आहे, असा संशय आरोपी प्रियकराला होता. त्यातून दोघांमध्ये भांडणं सुरु होती. याच भांडणातून आरोपीने तरुणीची हत्या केली. आरोपीने प्रेयसीचा राग मनात धरुन एक मोठ्या इंडस्ट्रीयल पान्याने मुलीच्या डोक्यात मारुन तिची हत्या केली. या हल्ल्यानंतर मुलगी धाडकन कोसळली आणि काही क्षणांतच तिचा जीव गेला. याप्रकरणी हत्येचा कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्या तरूणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: