Viral Video : उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये रात्री उशिरा वाघ जंगलातून बाहेर आला आणि लोकवस्तीच्या परिसरात घुसला. यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. हा वाघ घराच्या भिंतीवर चढून आरामात बसला. वाघाला भिंतीवर विसावल्याचे पाहून भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याने ग्रामस्थ सावध झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा वाघ पिलीभीत जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून बाहेर आला आणि रात्री काली नगर भागातील अटकोना गावात पोहचला. वाघाची बातमी आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर भिंतीवर झोपलेल्या वाघाचे दर्शन पाहण्यासाठी गर्दी जमली.
वाघाने गावातील रहिवाशांना रात्रभर जागे केले आणि स्वतः भिंतीवर झोपून राहिला. घरात वाघ असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र अद्याप वाघ पकडला गेला नाही.
Uttar Pradesh : The tiger, which came out of the Tiger Reserve forest in Pilibhit district and reached Atkona village in the night, is still resting on the wall of the Gurudwara. A huge crowd has gathered to see the Tiger. A security cordon has been created by the Forest… pic.twitter.com/lvGWH7VHmb
— All India Radio News (@airnewsalerts) December 26, 2023
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये वनविभागाविरोधात संताप व्यक्त होत आहे. वनविभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे जंगलातून वाघ घरात घुसू लागले आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाघाने माणसावर हल्ला केल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पिलीभीत हे व्याघ्र प्रकल्प असून जिल्ह्यात चार महिन्यांत वाघांच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 2015 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून वाघांच्या हल्ल्याच्या किमान चार डझन घटनांची नोंद झाली आहे.