Viral Video : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता भाजपची हायकमांड मुख्यमंत्री ठरवण्यात व्यस्त आहे. निवडणुकीचा निकाल लागताच आमदार एक्शन मोडमध्ये आले. भाजपचे हवामहलचे आमदार बालमुकुंद आचार्य फोनवर अधिकाऱ्यांना इशारा देत आहेत की, संध्याकाळपर्यंत सर्व मांसाहारी गाड्या रस्त्यावरून हटवाव्यात.
हवामहलचे भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी अधिकाऱ्याला फोनवर इशारा देत आहे की तो उघड्यावर मांसाहार विकू शकतो का? त्याचे अधिकारी इकडे तिकडे बोलू लागले तेव्हा संतापलेल्या आमदाराने २४ तासांत सर्व गाड्या हटवण्याचा इशारा फोनवर दिला. संध्याकाळपर्यंत सर्व रस्ते मोकळे करावेत.
मी संध्याकाळपर्यंत अहवाल घेईल
मार्केटमध्ये उभं राहून त्यांनी अधिकाऱ्याला बोलावून क्लास लावला. यानंतर उपस्थित लोकांनी जय श्री रामच्या घोषणा देत आमदाराच्या या कृतीचे स्वागत केले. संध्याकाळपर्यंत तुमच्याकडून अहवाल घेऊ, असेही आमदारांनी अधिकाऱ्याला सांगितले.
जयपुर: मीट, शराब की अवैध दुकानों पर बाबा Balmukund Acharya का बड़ा एक्शन | Navtej TV #HawaMahal #balmukundacharya #jaipurnews #RajasthanElection2023 pic.twitter.com/gSZkItwe7M
— Yogendra Mittal (@YogendraMitta13) December 4, 2023