Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनViral Video | मुर्तिजापूरच्या पोट्याचा मराठी गाण्यावर किलर एक्स्प्रेशनसह जबरदस्त डान्स...व्हिडीओ व्हायरल...

Viral Video | मुर्तिजापूरच्या पोट्याचा मराठी गाण्यावर किलर एक्स्प्रेशनसह जबरदस्त डान्स…व्हिडीओ व्हायरल…

Viral Video : रीलच्या या युगात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियावर आपापल्या कौशल्याच्या जोरावर रातोरात स्टार बनत आहेत. इंटरनेटवर डान्सच्या संबंधित बहुतांश व्हिडिओ पाहिले जातात. अलीकडेच, असाच एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये एक मूलगा मराठी गाण्यावर किलर एक्स्प्रेशनसह जबरदस्त डान्स करीत आहे. या व्हिडिओतील मुलाचा डान्स आणि एक्सप्रेशन पाहून तुम्हीही या मुलाचे चाहते व्हाल.

या मजेशीर व्हिडिओमध्ये लुंगी आणि शर्ट घातलेला हा मुलगा जंगलात उभा असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलगा प्रियत्तमा प्रियत्तमा मराठी गाण्यावर नाचताना दिसत आहे. व्हिडिओतील मुलाच्या हालचाली आणि हावभाव पाहून तुमचंही मन गमवावं लागेल. व्हिडिओतील मुलाचे किलर स्माईल आणि डान्सिंग स्टाइल सोशल मीडिया यूजर्सना वेड लावत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर __.shruuuu.____02 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहिला आणि आवडल्या जात आहे. या मुलाचे नाव श्रीकांत खंडारे आहे जो अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे ला राहतो या उत्तम डान्सर ने या 25 मे रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, भावा मी तुझी खूप ❤️❤️😍😍😍मोठी फॅन झाले.आणखी एका यूजरने लिहिले की, खूप सार क्रेडिट कॅमेरामन ला जाते.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: