वासिम काझी,अमरावती
Viral Video :अमरावतीत काल पावसाने हजेरी लावली, अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला पाउस बरसल्याने अमरावतीकरांना उकर्ड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, दरम्यान पाऊस पडल्याचा आनंद एका व्यक्तीला फारच झाला त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाऊस पडल्यानंतर एक व्यक्ती इतका आनंदी झाला की तो रस्त्याच्या मधोमध नाचू लागला. पावसात भिजताना या व्यक्तीने जबरदस्त डान्स करून लोकांची मने जिंकली आहेत. कोण आहे तो व्यक्ती जन्न घेवूया.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ‘आगे है बरसात, पीछी है तुफान’ या गाण्यावर डान्स करत आहे. पावसात रस्त्याच्या मधोमध दुकानासमोर नाचणाऱ्या व्यक्तीच्या स्टेप्स पाहून लोक प्रभावित होत आहे. वयाने हा माणूस वयोवृध्द असल्याचे दिसत आहे. वयोवृद्ध असून सुद्धा एका तरुणापेक्षा जास्त स्फृती दिसत असल्याने लोकांना खूप आवडले आहे. सदर व्यक्ती महेबूब भाई असून ते अमरावती शहरातील पठाण चौकातील रहिवाशी आहेत. ते चांगले डान्सर असून सोशल मिडियावर त्यांचे धाम्ल डान्स खूप प्रसिध्द आहेत.
अब जब इतना तरसा के बारिश होगी तो ये तो होगा ही 😁 pic.twitter.com/7Ko2sKA4pC
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) June 27, 2024
डान्स पाहून लोक आश्चर्यचकित झाले
जीन्स, टी-शर्ट आणि कॅप घालून नाचणारी व्यक्ती पाहून दुकानदारांनाही आश्चर्य वाटले. अनेकांनी त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांकडून अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत. एकाने लिहिले की आता एवढा पाऊस पडल्यावर हे नक्की होईल. एकाने लिहिले की, ज्याची मजा जिवंत आहे, त्याचे व्यक्तिमत्त्व जिवंत आहे.
एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, या वयातही इतकी चपळता! खरोखर आश्चर्यकारक. एकाने लिहिले की काहीही असो, काकांनी उत्कृष्ट नृत्य केले आहे आणि ते कौतुकास पात्र आहेत. दुसऱ्याने लिहिले की बाबूभैया रीलच्या नशेत आहेत! प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे असते पण काका जींनी रीलसाठी काहीही अश्लील केले नाही पण त्यांची प्रतिभा पाहून आनंद होतो.
आणखी एका सोशल मीडिया वापरकर्त्याने कमेंट केली की, जर शरीर आणि मनाने बालपण जिवंत असेल तर समजून घ्या की तुम्हीही जिवंत आहात. दुसऱ्याने लिहिले की, आजच्या तणावपूर्ण वातावरणात असे व्हिडिओ पाहून आनंद होतो. खरे सांगायचे तर या व्हिडिओने माझा आजचा दिवस बनवला आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याचे म्हणणे आहे की लोक उष्णतेने इतके कंटाळले आहेत की त्यांना पाऊस पडताच भिजून नाचायचे आहे.