Viral Video : देशाने चंद्रावर मजल मारली पण आपल्या समाजातील अंधश्रद्धा कमी व्हायचं नाव नाही. ही आजच्या काळातील एक मोठी समस्या बनली आहे. लोक कोणत्याही पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारतात किंवा नाकारतात. सत्य जाणून घेतल्याशिवाय, ते त्यांच्या धार्मिक श्रद्धेनुसार गोष्टी योग्य आणि चुकीचे ठरवू लागतात. अशा बाबींमध्ये घाई न करता वैज्ञानिक आकलनाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर असेच एक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून येथे सरकारी हातपंपातून पाण्या ऐवजी दूध येत असल्याचा दावा करण्यात आला.
मलारी बसस्थानकात यानंतर मोठ्या संख्येने लोक भांडी आणि बाटल्या घेऊन हातपंपावर पोहोचले आणि ते दूध आहे असे समजून ते भरू लागले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारी हातपंपातून दूध चुकून पांढरे पाणी निघत असून ते भरण्यासाठी गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोक भगवान शंकराची स्तुती करू लागले आणि पांढरे पाणी वाहून जाऊ लागले. भगवान शंकराच्या चमत्कारामुळे हे घडल्याचे असे लोक म्हणतात.
काही लोकांनी याला निसर्गाचा चमत्कार म्हटले तर काही लोकांनी याला रासायनिक प्रतिक्रिया म्हटले. ही अफवा पसरताच सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नळातून दूध निघत असल्याची अफवा ज्याला ऐकू आली ते लगेच भांडे घेऊन त्या दिशेने धावू लागले. याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
यामागे काय कारण आहे?
गर्दी जमल्याची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून लोकांना समजावून सांगितले. असे असूनही तासनतास नळातून पांढरे पाणी येत राहिले आणि लोक ते भरून आपापल्या घरी नेत राहिले. डॉक्टरांनी असे पाणी पिण्यास मनाई केली आहे आणि असे म्हटले आहे की यामुळे माणूस आजारी होऊ शकतो. नळातून पांढरे पाणी येण्याचे कारण काय, हे वृत्त लिहेपर्यंत समजू शकले नाही. ते गलिच्छ पाणी असू शकते. नळ सील करण्यात आला आहे.
#Moradabad : अद्भुत चमत्कार !
— Sarvjeet jaiswal (@JaiswalSarvjeet) November 27, 2023
हैंडपैंप से पानी की जगह निकल रहा दूध
शिव मंदिर की मांग हुई तेज़
Must watch- https://t.co/pzEy71BNLU#UttarPradesh #viralvideo #Shivmandir pic.twitter.com/6OYOV1YeMh