Viral Video : सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. तुम्ही कार, बस सारख्या वाहनांना ढकलताना पाहिलं असेल, पण हेलिकॉप्टरला ढकलताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही लोक हेलिकॉप्टरला ढकलताना दिसत आहेत. हे हेलिकॉप्टर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे असल्याचा दावा केला जात आहे.
लँडिंग पॅडवर हेलिकॉप्टर उभे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हेलिकॉप्टरच्या आजूबाजूला बरेच लोक उपस्थित आहेत, बहुतेक पोलीस. काही वेळाने हे पोलिस हेलिकॉप्टरला धक्का देऊ लागतात. काही अंतरावर ढकलल्यानंतर हेलिकॉप्टर थांबले. जवळच उभ्या असलेल्या कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला, जो सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ उत्तराखंडमधील रुद्रपूरचा असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे सीएम धामी काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते पण त्यांच्या हेलिकॉप्टरचे पुढचे दोन टायर लँडिंग पॅडच्या मार्क पुढे गेले. त्यामुळे हेलिकॉप्टरला टेक ऑफ करताना कोणतीही अडचण आली नाही पाहिजे, त्यामुळे पोलिसांनी हेलिकॉप्टर तेथून मागे ढकलले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रशासनाचे म्हणणे आहे की पोलिस परेड ग्राउंडमध्ये हेलिकॉप्टरसाठी पांढरे चिन्ह लावण्यात आले होते. मात्र, हेलिकॉप्टर त्या चिन्हाच्या पलीकडे गेले होते. त्यामुळे पायलटच्या सूचनेनुसार पोलिसांनी हेलिकॉप्टर थोडे पुढे ढकलले. जमीन खचण्याची आणि इंजिनमध्ये बिघाड होण्याची शक्यता प्रशासनाने स्पष्टपणे नाकारली आहे.
एंबुलेंस, पुलिस की गाड़ी को धक्का लगाते तो अपने बहुत बार देखा होगा लेकिन अभी हेलीकॉप्टर को धक्का लगाते किसी को देखा है।
— (VedYodha) (@vedyodha1) December 20, 2023
यह उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी का हेलीकॉप्टर बताया जा रहा है, जो उधमसिंह नगर में फँस गया था। फिर क्या आप ख़ुद देखिए।#viralvideo pic.twitter.com/UdXdeWNLzY
मात्र, हेलिकॉप्टरला धक्का देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच तो व्हायरल झाला. सोशल मीडिया यूजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले की, तुम्ही अनेकदा एखाद्याला एम्ब्युलन्स किंवा पोलिसांच्या वाहनाला ढकलताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी एखाद्याला हेलिकॉप्टर ढकलताना पाहिलं आहे का?…