Viral Video: कोल्हापुरातील शाहूपुरी येथे एक विचित्र अपघात घडला आहे. येथे एका अनियंत्रित ऑटोने अनेक पादचाऱ्यांना धडक दिली आणि ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. मात्र, या अपघातात कोणाचीही फारशी हानी झाली नसून काही जणांना किरकोळ दुखापत झाली, ही दिलासादायक बाब आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक ऑटोचालक रस्त्याच्या मधोमध यू-टर्न घेत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने ऑटोला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार दोघेही खाली पडले इतकेच नाही तर ऑटोला धडकल्याने ऑटो चालकही खाली पडला. यानंतर ऑटो अनियंत्रित झाला आणि समोरून येणाऱ्या लोकांच्या अंगावर जाऊन आदळला.
हे पाहून एक महिला स्वत:ला वाचवण्यासाठी धावू लागली आणि त्यानंतर एक व्यक्ती तिच्या मदतीसाठी पुढे आली पण त्यानंतर ऑटोने दोघांनाही धडक दिली आणि दोघेही खाली पडले. यानंतर ऑटो पुढे निघाला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इतर वाहनांना धडकल्यानंतर थांबला.
महाराष्ट्र : बेकाबू ऑटो ने राहगीरों को मारी टक्कर, CCTV में कैद हुई घटना #Maharashtra | #CCTVFootage | #RoadAccident pic.twitter.com/YYcq8dkLRi
— NDTV India (@ndtvindia) June 16, 2024