Viral Video : बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र शास्त्री बंधू शालीग्राम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले असून यावेळी आचार्य धीरेंद्र शास्त्री नाराज झाले असून धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, तो माझा भाऊ नक्कीच आहे पण देशात कायदाही आहे. आमच्या भावाच्या वागण्याने आम्ही खूप दुःखी आहोत. असे त्यांनी म्हटले आहे. मागील वेळी एका लग्न समारंभात बंदुकीच्या धाकावर एकाला धमकावले होते. यावेळी त्यापेक्शःहे मोठा कांड केल्याचे समजते.
शालिग्रामचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा धाकटा भाऊ शालिग्राम गर्ग याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यांनी घरात घुसून कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये घरासमोर एक कार उभी आहे आणि अनेक लोक तेथे रागावून फिरताना दिसत आहेत.
ये धीरेंद्र शास्त्री का भाई है सरेआम गुंडागर्दी कर रहा है इससे पहले भी इसकी कई ऐसी तस्वीरें वायरल हुई खुद धीरेंद्र शास्त्री पर सरकारी जमीन पर कब्जा करने के आरोप है लेकिन हमारा मीडिया जाकर पर्ची निकलवाता है और नेता अपने जहाज में घुमाते हैं! pic.twitter.com/edT5O8D1XR
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) June 1, 2024
भावाच्या कृतीवर काय म्हणाले धीरेंद्र कृष्ण शास्त्री?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे धाकटे बंधू शालिग्राम गर्ग यांच्यावर थेट आरोप केले जात असताना, धीरेंद्र शास्त्री यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, एका वडिलांना अनेक पुत्र असतात आणि सर्वांचे गुण वेगवेगळे असतात. आमच्या भावाच्या वागण्याने आम्ही खूप दुःखी आहोत. आम्ही एवढेच म्हणू की कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे.
आम्ही भावासोबत नाही, कायद्यासोबत आहोत, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले. आम्ही आमच्या प्रवासात आहोत, ज्यामध्ये ध्येय खूप दूर आहे आणि संघर्ष महान आहे. जर आपण अशा प्रकरणांमध्ये अडकलो तर आपण आपले काम करू शकणार नाही. लोकांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतात. गावातील व कुटुंबातील व्यक्तींचे वागणे आपल्याशी जोडले जाऊ नये.
मीडिया और सोशल मीडिया पर चल रहे विवाद पर पूज्य सरकार द्वारा जारी बयान… pic.twitter.com/8Xq0v55I7c
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) June 1, 2024
धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम अनेकदा वादात आला आहे, लग्नात बंदूक दाखवून धमकी दिल्याने तो पहिल्यांदाच वादात आला होता, मात्र त्यानंतर त्यांच्यावर गुंडगिरीचे अनेक आरोप झाले. मात्र, पहिल्यांदाच धीरेंद्र शास्त्री यांनी व्हिडीओ जारी करून भावापासून वेगळं झाल्याची चर्चा केली आहे.