Thursday, December 26, 2024
HomeSocial TrendingViral Video | हवेत उडणारे हरीण...पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना...पहा व्हिडीओ

Viral Video | हवेत उडणारे हरीण…पाहून स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना…पहा व्हिडीओ

Viral Video : सोशल मिडिया जगच खूप विचित्र आहे. इथे कधी आणि काय बघायला मिळेल सांगता येत नाही. हल्ली असेच एक दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये काही हरीण हवेत उडताना दिसत आहेत, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांना ‘फ्लाइंग डीअर’ म्हणजेच हवेत उडणारे हरीण म्हणत आहेत.

व्हिडीओमध्ये हवेत उडताना दिसणारे हे हरणे प्रत्यक्षात स्वतःहून हवेत उडत नसून हेलिकॉप्टरला जोडलेल्या दोरीला बांधलेले होते. हा व्हिडिओ अमेरिकेतील उटाहचा आहे.

असे सांगितले जात आहे की जीवशास्त्रज्ञांनी जंगलातील वेगवेगळ्या ठिकाणाहून हे प्राणी पकडले आहेत आणि त्यांना जीपीएस (GPS) कॉलर लावले आहेत, जेणेकरून ते हे ठिकाण सोडून इतरत्र कुठे गेले तर त्यांचा पॅटर्न समजू शकेल.

हा व्हिडिओ यूटाह डिव्हिजन ऑफ वाइल्डलाइफ रिसोर्सेस (DWR) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर त्यांच्या खात्यावरून शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे सांताचे उडणारे हरण नाहीत. खरं तर, दरवर्षी हिवाळ्यात, आमचे जीवशास्त्रज्ञ राज्यभरात सुमारे 1200 हरणे पकडतात आणि त्यांना GPS कॉलर लावतात.

त्यांना अशा भागात देखील आणले जाते जिथे त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. हा महत्त्वाचा प्रयत्न आम्हाला हरणांच्या स्थलांतराच्या पद्धतींवर नजर ठेवण्यास आणि समजून घेण्यास मदत करतो.

हवेत उडणाऱ्या हेलिकॉप्टरला दोरी बांधलेली असून त्यात हरणे लटकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी तो घाबरू नये म्हणून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आहे.

थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांना जमिनीवर कसे आणले जाते हे नंतर व्हिडिओमध्ये दिसेल. व्हिडिओमध्ये काही लोक हरणावर जीपीएस लावताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: