Viral Video : लग्नात मुलीच्या बिदाई साठी हेलिकॉप्टर बिहारच्या जेहानाबाद जिल्ह्यात पोहोचले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने उतरण्यास परवानगी दिली नाही. यानंतर मुलाने गावावर हेलिकॉप्टरच्या सात फेऱ्या मारल्या. शेवटी वधू-वरांना गया विमानतळ मार्गे जमशेदपूरला निरोप द्यावा लागला. हे प्रकरण जेहानाबाद जिल्ह्यातील गोशी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहाद्दीपूर गावातील आहे.
मोहाद्दीपूर गावात राहणाऱ्या रामानंद दास यांना त्यांच्या डॉक्टर मुलीला लग्नानंतर हेलिकॉप्टरमधून निरोप देण्याची मनापासून इच्छा होती. वधूची आई राजकुमारीही नुकतीच रेल्वे रुग्णालयातून निवृत्त झाली होती. आपल्या मुलीच्या लग्नानंतर त्यांना हेलिकॉप्टरने गावातून निरोप द्यावा, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मात्र प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्याने वधू-वरांना गया विमानतळावरूनच विमानाने जावे लागले. प्रशासकीय संमती न मिळाल्याने वधूच्या कुटुंबात खंत असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
9 लाख रुपयांत भाड्याने हेलिकॉप्टर बुक केले होते. रामानंद दास यांनी त्यांची डॉक्टर मुलगी मेघा राणी हिचा विवाह जमशेदपूरचे रहिवासी डॉक्टर विवेक कुमार यांच्याशी 27 नोव्हेंबर रोजी बोधगया येथील एका हॉटेलमध्ये केला होता.
28 नोव्हेंबर रोजी त्यांनी हेलिकॉप्टरमधून त्यांच्या मूळ मोहाद्दीपूर गावाला निरोप देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली होती. त्यांच्या निरोपासाठी त्यांचा मुलगा मृत्युंजय कुमारने पाटणा येथून सुमारे 9 लाख रुपयांना भाड्याने हेलिकॉप्टर बुक केले होते.
हेलिकॉप्टर उतरण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी गावातील शेतात हेलिपॅड तयार केले होते, मात्र सुरक्षेचे कारण सांगून जिल्हा प्रशासनाने लँडिंगला परवानगी दिली नाही.त्यामुळे हेलिकॉप्टर गया विमानतळावरून निघून मोहाद्दीपूर गावावर घिरट्या घालत होते आणि मग जमशेदपूरला रवाना झाले.
#Jehanabad दुल्हन लेने पहुंचे हेलिकॉप्टर के पहुंचे दुल्हे को नहीं मिली लैंडिंग की परमिशन, मंडप के ऊपर लगाए सात फेरे pic.twitter.com/U64tLVbYof
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) November 30, 2023
वधूचे वडील रामानंद दास यांनी सांगितले की, “माझी मुलगी घरी शिक्षण घेऊन डॉक्टर झाली होती. त्यामुळे त्यावेळी आम्ही करार केला होता की, बाहेरच्या अभ्यासासाठी लागणार्या पैशातून मी माझ्या मुलीला हेलिकॉप्टरने निरोप देईन. पण प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत परवानगी दिली नाही.