Sunday, December 22, 2024
HomeSocial TrendingViral Video | ७ वर्षाच्या मुलीने चार वर्षाच्या मुलाला दिले विहिरीत ढकलुन...त्याला...

Viral Video | ७ वर्षाच्या मुलीने चार वर्षाच्या मुलाला दिले विहिरीत ढकलुन…त्याला सुखरूप बाहेर कसे काढले?…

Viral Video – आपण बऱ्याचदा ऐकतो खेळता खेळता मुल बोअरवेलच्या गड्ड्यात पडले. लहान मुले खेळताना अनेकदा अशा चुका करतात, ज्याचे परिणाम कधी कधी खूप वाईटही होतात. असे बरेच लोक असतील ज्यांनी लहानपणी केलेल्या चुकीमुळे इतरांना किंवा स्वतःला जाणून बुजून किंवा नकळत दुखावले असेल.

नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मुलांना एकटे सोडू नका आणि त्यांच्याशी शक्य तितकी काळजी घ्या हेही या व्हिडिओतून शिकता येईल. या धक्कादायक व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी खेळकरपणे तिच्यापेक्षा लहान भावाला आपल्या मांडीत उचलून विहिरीत फेकताना दिसत आहे.

हा व्हिडिओ चीनचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दोन मुलं विहिरीजवळ कशी खेळत आहेत, ती लहान मुलगी लहान मुलाला आपल्या कडेवर घेऊन विहिरीजवळ घेऊन जाते तेव्हा दिसतं. यानंतर मुलीने मुलाला विहिरीत ढकलले.

पडताना मुलाने आपल्या दोन्ही हातांनी विहिरीची भिंत पकडली, त्यानंतर मुलीने त्याचे दोन्ही हात भिंतीवरून सोडवले आणि त्याला दूर ढकलले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मूल रडत आहे, पण त्याच्या मदतीला कोणीही येत नाही. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने लोकांना हादरवले आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @cctvidiots नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत.

1 मिनिट 37 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 14.7 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चीनमध्ये एका लहान मुलीने 4 वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकले.’ व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘भयानक व्हिडिओ.’

सात वर्षांच्या मुलीने सांगितले की तिने टीव्ही ड्रामावर जे पाहिले त्याची ती नक्कल करत होती. बीजिंग न्यूजनुसार युन्नान प्रांतातील सॉन्गमिंग काउंटीमधील पोलिसांनी सांगितले की, पाच मीटर खोल आणि दोन मीटर पाण्याने भरलेल्या विहिरीतून मुलगा मदतीसाठी रडत होता. विहिरीत पडल्या गावकऱ्यांनी 10 मिनिटांनंतर मुलाची सुटका केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: