Viral News : भारत देश हा जगातील पाचवी अर्थव्यवस्था समजला जाणारा देश मात्र येथील वास्तव वेगळच आहे. येथील गरीब जनता अजुनही हलाखीचे जीवन जगत आहे. तर उत्तर प्रदेशातील प्रयागराज Prayagraj Jhunsi मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झुंसी येथे महिलेच्या मृत्यूनंतर वडील आणि पती तिचा मृतदेह बांबूला लटकवून अंतिम संस्कारासाठी घेऊन जात होते. मृतदेह जेव्हा अंत्यसंस्कारासाठी घेवून जात होते तेव्हा लोक आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. तेथून जाणाऱ्या काही लोकांचे मन हेलावले. त्यांनी थांबून त्यांच्याकडून माहिती घेतली आणि काही पैशांच्या मदतीने मृतदेह ई-रिक्षाने गंगा घाटावर पाठवण्याची व्यवस्था केली. झुंसी पोलीसही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
सुमारे 30 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन लोक काठीला कापड बांधून मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही लोक त्यांच्या लक्षात येतात. असे विचारले असता ते आपल्या व्यथा मांडतात. त्यामुळे काही लोकही त्याच्या मदतीसाठी पुढे येतात. वाराणसीत राहणारे आदिवासी समाजातील दोन लोक महिलेचा मृतदेह बांबूला लटकवून दारागंज गंगा घाटावर घेऊन जात होते. हे दोघेही महिलेचे पती आणि वडील आहेत. पाने विकून जगणारी ती माणस. महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेह नेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. तो झुंसी येथील नेबी गावात राहतो आणि पाने विकून आपला उदरनिर्वाह करतो.
महिलेचा पती नखडूने सांगितले की, पत्नी अनेक दिवसांपासून आजारी होती आणि शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. पैशांअभावी ते बांबूमध्ये बांधून त्याची झोळी करून दारागंज पुलाखाली राहणाऱ्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन चालले होते. मयत अनिता (२६) चे वडिलांनी सांगितले की, पैसे नसल्यामुळे तिला पायी बांबूला बांधून घेऊन जावे लागले. यावेळी जमलेल्या गर्दीतील काही लोकांनी प्रत्येकाने काही ना काही मदत केली.
#Prayagraj #Jhunsi
— The Mirror (@ncr_mirror) October 14, 2023
Poor Man Carried the dead body on foot for the last rites.
The laborer's husband tied the woman's body in a bundle and took it away.
Passersby helped after seeing the dead body being carried away
police also came forward to help the victim pic.twitter.com/pCIrNvOLu7