Viral News : आपल्या देशात गुरुशिष्य परंपरा फार जुन्या काळापासून मानली जाणारी परंपरा आहे, आपल्या संस्कृती मध्ये गुरूला आदराचे स्थान आहे. पण अलीकडच्या काळात जेव्हापासून मोबाईल आले तेव्हापासून ही परंपरा डागाळली असल्याचे दिसते. अशीच घटना सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकासोबतचे फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
या छायाचित्रांमध्ये शिक्षिका तिच्या विद्यार्थ्याला मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहे. त्याच वेळी, एका छायाचित्रात ती तिच्या विद्यार्थ्याला तिच्या मांडीवर घेऊन उचलताना दिसत आहे. अमित सिंह राजावत नावाच्या युजरने हे फोटो X वर पोस्ट केले आहेत.
डेक्कन हेराल्डच्या म्हणण्यानुसार, “फोटोशूट” एका अभ्यास दौऱ्यादरम्यान झाले आणि शिक्षिका मुरुगमल्ला येथील सरकारी हायस्कूलच्या होत्या. तर, विद्यार्थी दहावीत शिकतो. ही छायाचित्रे शेअर करताना युजरने लिहिले होते की, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत.
हे चित्र समोर आल्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी ब्लॉक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहितीही युजरने दिली होती. शिक्षिकेच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्याची ओळख उघड झालेली नाही. सोशल मीडिया यूजर्सनेही या पोस्टवर आपल्या जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Where are we heading as a society ?
— Amit Singh Rajawat (@satya_AmitSingh) December 28, 2023
Pictures and videos from a romantic photoshoot of a government school teacher with a Class 10 student in Karnataka's Murugamalla Chikkaballapur district, went viral, following which the student's parents filed complaint with the Block… pic.twitter.com/WviIHtOP3J
या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, तक्रार मिळाल्यानंतर बीईओ व्ही उमादेवी यांनी शाळेला भेट दिली आणि काही चौकशी केली. अधिकाऱ्याने आउटलेटला सांगितले की तिला योग्य चौकशी केल्याशिवाय काहीही बोलायचे नाही.