अहेरी तालुका काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट…
अहेरी – आल्लापल्ली मार्गाची मागील दोन वर्षापासून दुरावस्था झालेली आहे खड्डे बुजवून थातूरमातूर उपाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे सामाजिक कार्यकर्त्यांकडून केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना वर्षभरापूर्वी निवेदन देण्यात आले होते.
माध्यामांद्वारे अनेकदा या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले तरीसुद्धा जैसे थे परिस्थिती आहे, दोन महिन्यापूर्वी खड्डे बुजवून डांबर पॅच करण्यात आली परंतु काही कालावधीतच हा रस्ता फार खराब झालेला आहे, दुचाकी व चार चाकी वाहनांना, वाहन चालवताना फार त्रास सहन करावा लागत आहे, महिलांना तर या मार्गावरून गाडी चालवणे मुश्किल झालेले आहे,
अनेकदा निवेदने देऊन वृ प्रसिद्धी देऊन काहीच होऊन राहिलेले नाही, ही बाब अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे लक्षात येताच, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्ता मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती दिली 15 दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास अहेरी तालुका काँग्रेस कमिटी कडून तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला याप्रसंगी अहेरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉक्टर निसार हकीम तसेच अशोक आईंचवार. रज्जाक पठाण, बबलू सडमेक, नामदेव आत्राम, राघोबा गोरकर, रुपेश बंदे ला, हनीफ शेख व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.