पारस – सुधीर कांबेकर
परिसरातीत रेल्वे गेट ते मनारखेड कडे जाणारा रस्ता हा मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाला असून रसत्यावरील मोठ मोठ्या खड्यांमुळे नागरिक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत दोन वर्ष आधी हा रस्ता दुरुस्त करण्यात आला होता मात्र दुरुस्तीचे काम व्यवस्थित झाले नसल्याते रस्ताची पुन्हा अल्पावधीत मोठी दुरावस्था झाली आहे या रस्त्यांचे दुरुस्ती साठी शिवसेना निवासी उपजिल्हा प्रमुख संजय शेळके तसेच मनारखेड ग्रामस्थांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्गा पासून पारस कडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने था रसत्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली असून वाहन चालकांन सह प्रवशांना हा रस्ता तापदायक तसेच डोकेदुखी ठरत आहे तर खड्यांमुळे या रोडवर अपघात सुद्धा होत असतात परंतू या बाबीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे करिता या रस्त्याची सुद्धा दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.