एकाच दिवशी शेकडो ग्रामस्थांना शिधापत्रिकेचे वाटप
पातुर – निशांत गवई
तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या फेऱ्या लक्षात घेता शासनाने नुकता चालू केलेल्या शासकीय योजनेची जत्रा व महाराजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत खेट्री येथे दिनांक 10जून रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
खेट्रि येथील सरपंच जहुर खान यांनी वेळोवेळी पातुर तहसीलदारांना भेटून हा कार्यक्रम खेट्री येथे व्हावा त्यामुळे परिसरात येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा प्रचंड फायदा होईल या उद्देशाने खेट्री येथे कार्यक्रमाचे आयोजन केले व एकाच दिवशी एकाच छताखाली महाराजस्व अभियान शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिक लोकांचे पात्र लाभार्थ्यांना दुय्यम शिधापत्रिकाचे वितरण शिधापत्रिकेत नाव दुरुस्ती,
उत्पन्नाचे दाखले, श्रावण बाळ निराधार योजना संजय गांधी विधवा व अपंग योजना , जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, पातुर तहसील कार्यालय अंतर्गत वितरित करून पातुर तहसीलदार यांच्याकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवी काळे पातुर तहसीलदार, तर नायब तहसीलदार विजय खेडकर होते, श्री घुगे नायब तहसीलदार, भगवंत आले, नरेंद्र बेडेरे, सुनील लठाड, दीपक देशमुख, विनीत ताले पुरवठा अधिकारी, आधी शासकीय कर्मचाऱ्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाल्याचे समजले आहे.
ग्रामीण भागात येणाऱ्या खेट्री येथे नुकताच झालेल्या महसूल विभाग यांच्या अंतर्गत शासकीय योजनेची जत्रा व महाराजस्व अभियान शासन आपल्या दारीया संकल्पनेमुळे तहसील कार्यालयात होणारी वर्दळ व ग्रामीण भागातील लोकांना होणारा त्रास निश्चित कमी होणार आहे.
आमच्या विनंतीस मान देऊन महसूल विभागाने अतिशय ग्रामीण भागामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले त्यामुळे खेट्री परिसरात येणाऱ्या गावांतील लोकांना त्याचा फायदा झाल आहे. त्यामुळे.गावकऱ्यांच्या वतीने आपला आभार व्यक्त करण्यात येत आहे. जहूर खान सरपंच खेट्री.