Thursday, January 23, 2025
Homeराज्यमूर्तिजापूर भाजप आमदारावर संतापले गावकरी... गावकऱ्यांनी आमदाराला केली गावबंदी…पण आमदार म्हणतात…

मूर्तिजापूर भाजप आमदारावर संतापले गावकरी… गावकऱ्यांनी आमदाराला केली गावबंदी…पण आमदार म्हणतात…

मूर्तिजापूर : एकीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यात आमदार, खासदार, राजकीय नेत्यांना गावबंदी सारखे निर्णय बऱ्याच ठिकाणी सूरू असताना अकोला जिल्ह्यात मात्र गावरस्त्यासाठी भाजप आमदाराला गावबंदी केली आहे. रस्त्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली गावकऱ्यांनी भाजप आमदार हरिष पिंपळेंना गावबंदी केली. अशा प्रकारचे फलक चिंचोली गावात लावले आहेत. गावकऱ्यांनी भाजप आमदाराला अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी घातली, परंतु अद्यापही रस्ता झाला नाहीये. अखेर गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला अन् भाजप आमदार हरीश पिंपळेंना गावबंदी सारखा कठोर निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर मतदारसंघाचे भाजप आमदार हरिष पिंपळे यांच्याविरोधात गावकरी चांगलेच संतापले आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली गावच्या रस्त्याप्रकरणी आमदार पिंपळेंनी दखल न घेतल्याने हा संताप आहे.

आमदारा अन् गावकऱ्यांमध्ये झाला होता शाब्दिक वाद;

देशभरात आदीशक्तीची १०८ पीठं आहेत. याच शक्ती पिठांच्या मांदियाळीतील चौदावं पीठ म्हणजे अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवी. अकोल्यापासून ३० किलोमीटर अंतरावरील चिंचोली गावाजवळील गडावर रुद्रयानीदेवी विराजमान असून हे एक मोठं तीर्थस्थळ आहे. या तीर्थस्थळापर्यत स्थानिक गावकऱ्यांनी भाजप आमदाराला अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी घातली होती. परंतु अद्यापही रस्ता झाला नाहीये. २३ तारखेला गावकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला, भाजप आमदार हरिष पिंपळे आणि कार्यकर्ते रुद्रायणी देवीच्या दर्शनासाठी आले असता त्याचवेळी गडाच्या पायथ्याशी गावकऱ्यांनी त्यांना थांबवलं आणि रस्त्या संदर्भात जाब विचारला.

या दरम्यान पिंपळे आणि चिंचोली गावकऱ्यांमध्ये चांगला शाब्दिक वाद पाहायला मिळाला होता. या संदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर वायरल झाले होते. या वादादरम्यानं आमदारांच्या समर्थकांनी गावकऱ्यांना लोटपोट करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले होते. या प्रकारावेळी बार्शीटाकळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. परंतु वादादरम्यान संपूर्ण शब्दांचा खेळ रंगला होता. भाजप आमदाराच्या समर्थकांनी जाब विचारण्यासाठी आलेल्या एका तरुणाला लोटलाट केली असता, त्याने म्हटलं हात नाही लावायचा साहेब, आमदार करून दिलंय तर प्रश्न विचारणारचं. तर आमदारानं स्पष्टच शब्द खुनावून सांगितलं होतं की गावकऱ्यांना तुम्ही जिल्हा परिषदची NOC आणा, रस्ता नाही झाला तर गावबंदी करा. दरम्यान रस्ता का करीत नाहीये? तुम्हाला आमदार कशासाठी निवडून दिले? अशा कडक शब्दात लोकांनी प्रश्न समोर ठेवले. या दरम्यान प्रश्न विचारणारा तरुण रुद्रास राठोड आणि आमदारामध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली. तेव्हा हे प्रकरण बार्शीटाकळी पोलीस स्टेशनपर्यत गेलं होतंय.

गावात एंट्री नाहीये, आल्यास रस्त्यावर अड़वू-

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी चिंचोली गावकऱ्यांचा लढा सुरू आहे. मात्र आमदारांकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये. आज पिंपळे हे पंधरा वर्षापासून आमदार आहे, त्यात सरकारमध्येही आहे, आमदार असूनही आम्हा गावकऱ्यांना जिल्हा परिषदेची एनओसी आणायला सांगतात, खरं किती दुर्दैवी बाब आहे, असेही अनिरुद्ध पाटिल गावचे उपसरपंच म्हणाले. आता जोपर्यंत गावाचा रस्त्याचा मार्ग सुटणार नाहीये, तोपर्यंत हरीश पिंपळे यांना गावात शिरू (एंट्री) देणार नाहीये. म्हणजे ७५ टक्के गावकऱ्यांनी पाठिंबा देत हा निर्णय घेतला असल्याच रुद्रास राठोड म्हणतोय. तसेच गाव बंदीचे फलक ठिकठिकाणी गावात लावले आहेत. गावात आल्यास रस्त्यावरच थांबावू, अशा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

मला गावकऱ्यांचा विरोधच नाही-

चिंचोली ग्रामस्थ ‘गावबंदी’ या निर्णयाचा विरोध करत आहे, रुद्रास् राठोड अन् त्याचे काही साथीदारांनी हा निर्णय घेत आणि फलक गावात लावले आहेत. आज गावबंदी करतो म्हटलं तर गावबंदीचे फलक रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच लावणे अपेक्षित असते, पण असं काही नाहीये. त्यामुळ याला गावबंदी म्हणता येईल नाही, त्यामुळ कोणीही याकडे लक्ष देऊ नका, असे भाजपा आमदार हरीश पिंपळे म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: