भर पावसाळ्यात कुटासा येथे पाणी टंचाईचे चटके
अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे गेल्या काही दिवसांपासून ७ ते ८ दिवसाआळ पाणीपुरवठा केल्या जात असल्याने येथील नागरीक त्रस्त झाले आहेत.भर पावसाळ्यात जर ७ ते ८ दिवसाआळ पाणी पुरवठा केल्या जात आहे तर उन्हाळ्यात किती दिवसाआळ पाणी पुरवठा मिळेल यांची चिंता आता ग्रामस्थांना जाणवत आहे.
धरणात मुबलक साठा उपलब्ध असल्यावर सुद्धा तालुक्यातील खेड्या गावात पाणी टंचाईचे चटके आतापासूनच जाणवायला लागले आहेत.कुटासा हे गाव खारपाणपट्यात येत असुन या गावाची लोकसंख्या सुमारे 1200 हजाराच्या आसपास आहे.या गावात नळाशीवाय दुसरा पाण्याचा कुठलाही स्रोत नसल्याने गावातील ग्रामस्थांचे जिवन हे नळाच्या पाण्याच्या भरवशावर अवलंबून आहे.परंतु जिवन प्राधीकरण अधिकाऱ्यांच्या हेकेखोरीमुळे गांवात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
गावातील ग्रामस्थांनी या पाणी टंचाई विरोधात काल ग्रामपंचायत मध्ये धडक देऊन गावात सुरु असलेल्या पाणी टंचाई बाबत ग्रामपंचायत प्रशासक व सचिव यांना माहिती दिली यावरुन प्रशासक व सचिव यांनी जिवन प्राधीकरण उपविभाग अधीकारी यांना कुटासा गावात ७ ते ८ दिवसाआळ पाणीपुरवठा होत असल्याने तो पाणीपुरवठा ३ दिवसाआळ करावा अशायाचे पत्र काल जिवन प्राधीकरण उपविभागीय अधीकारी यांना पाठवुन गावात लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करु व इतरही समस्या लवकर मार्गी लावु असे आश्वासन ग्रां प प्रशासक जितेंद्र नागे व सचिव आर एम फुलारी यांनी ग्रामस्थांना दिले यावेळी ग्रा. प प्रशासक जितेंद्र नागे सचिव आर एम फुलारी ऑपरेटर स्वप्निल बुटे कर्मचारी बाळु ठाकुर पत्रकार कुशल भगत, निरंजन गांवडे ,पवन निकम ,कृषी मित्र शेख मुलसरीम ,उमेश भाऊ थोटे, बाबुराव लाखे, उमेद महीला बचत गटाच्या अध्यक्षा बावने ताई ,गांवडे ताई महादेव शेलकर ,हरीष बोदडे व गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.