Monday, November 18, 2024
Homeराज्यप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी गावपातळीवर संपृक्तता मोहीम सुरू...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी गावपातळीवर संपृक्तता मोहीम सुरू…

akl-rto-3

अकोला – संतोषकुमार गवई

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या परिपूर्ण अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून गावपातळीवर संपृक्तता मोहिम राबविण्यात येत आहे. त्यात दि. 21 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी प्रमाणीकरण व इतर बाबींची पूर्तता करून घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी येथे दिली.

केवळ ई- केवायसी प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतक-यांनी आपल्या नजिकच्या सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) यांचे मार्फत प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे. शेतक-यांनी स्वत:चे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी.एम.किसान फेस ऑथेंटीकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा.

पी.एम.किसान योजने अंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतक-यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे.

बँक खात्याला आधार संलग्न करावयाचा राहिलेल्या शेतक-यांनी आपल्या सोयीनुसार प्राधान्याने नजिकचे पोस्ट कार्यालयात आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी.एम.किसान योजनेचा 16 वा हप्ता माहे फेब्रुवारी, 2024 च्या शेवटच्या आठवड्यात वितरित करणार आहे. तसेच पी.एम.किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल.

या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दि.21 फेब्रुवारीपर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिका-यांनी केले आहे. अधिक महितीसाठी नजिकचे कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी 6 डिसेंबर2023 ते 15 जानेवारी2024 या कालावधीत मोहीम राबविण्यात आली होती. अकोला जिल्ह्यातील एकूण 1 लाख 91 हजार 908 शेतक-यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ 3 हजार 204 ई-केवायसी करणे बाकी आहे. ते या मोहिमेत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणि जाहिराती साठी संतोषकुमार गवई अकोला ९६८९१४२९७३

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: