रामटेक – राजू कापसे
निवडणुक प्रक्रियेत ‘ पर्यवेक्षक ‘ म्हणुन उत्कृष्ट कार्य बजावणारे ग्रामविकास अधिकारी नारायण जगणजी कुंभलकर यांचा नुकताच परिक्षाविहीन आय.ए.एस. अधिकारी कुशाल जैन तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
नारायण कुंभलकर हे रामटेक तालुक्याच्या आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायत बोथिया पालोरा येथे सलग आठ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी या कार्यकाळात निवडणुक प्रक्रियेत ‘ पर्यवेक्षक ‘ म्हणुन उत्तम कार्य बजावले. निवडणुक निर्णय अधिकारी तथा बी.एल.ओ. यांच्यामधील दुवा असलेले पर्यवेक्षक कुंभलकर यांनी वेळेत सर्व संबंधीत कामे व कर्त्यव्ये सुलभतेने पार पाडल्यामुळेच मी या पुरस्काराचा माणकरी ठरलो असल्याचे माहिती देतांना सांगितले.
१४ व्या राष्ट्रीय मतदार दिनी ग्रामविकास अधिकारी तथा पर्यवेक्षक श्री. नारायण जगणजी कुंभलकर यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल परीक्षावीहीन आय.ए.एस. अधिकारी कुशाल जैन, उपविभागीय अधिकारी रामटेक महसुल वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहने, बिडीओ जयसिंग जाधव तसेच पारशिवणीच्या तहसिलदारांकडून रामटेक येथे तर नागपुर येथे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी पुष्प गुच्छ तथा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला