Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsVietnam | हनोईतील नऊ मजली इमारतीला भीषण आग...५० जणांचा होरपळून मृत्यू...

Vietnam | हनोईतील नऊ मजली इमारतीला भीषण आग…५० जणांचा होरपळून मृत्यू…

न्युज डेस्क – Vietnam व्हिएतनामची राजधानी Hanoi हनोई येथील नऊ मजली अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात ५० जणांचा लोकांचा होरपळून मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनोईच्या Than Xuan थान झुआन जिल्ह्यातील एका अपार्टमेंटच्या पार्किंग फ्लोअरमध्ये मंगळवारी रात्री 11.50 वाजता आग लागली. नंतर या आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. खोंग हो स्ट्रीटजवळील एका अरुंद गल्लीत इमारतीचे स्थान असल्याने बचाव पथकांना पोहोचणे कठीण झाले.

200 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या इमारतीत 150 लोक राहतात. बुधवारी पहाटे 5 वाजेपर्यंत अपार्टमेंटमधून 70 जणांची सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी 54 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ५० जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

व्हिएतनामी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमध्ये लागलेली आग खूप भीषण होती. बुधवारी सकाळी आगीवर नियंत्रण मिळवता आले. बचाव पथके वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव कर्मचार्‍यांना कसरत करावी लागली, असेही सांगण्यात आले.

झोपेत असताना त्याला धुराचा वास येत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्याने बाहेर पाहिले असता आग लागल्याचे लक्षात आले. कुटुंबातील सदस्यांना दोरीच्या सहाय्याने त्वरीत खाली आणण्यात आले. दुसर्‍याने सांगितले की त्याने पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ज्वाळा जळत असल्याचे पाहिले. लोक मदतीसाठी ओरडत होते. याबाबत तातडीने अधिकाऱ्यांना माहिती दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: