Sunday, December 22, 2024
Homeराज्यविद्यासागर कला महाविद्यालयात बरसलेल्या श्रावणधारांनी श्रोते झालेत ओलेचिंब...

विद्यासागर कला महाविद्यालयात बरसलेल्या श्रावणधारांनी श्रोते झालेत ओलेचिंब…

रामटेक – राजु कापसे

अनेक जुन्या नव्या कवींच्या दमदार आणि भावस्पर्शी कवितांनी विद्यासागर कला महाविद्यालयाच्या स्व. डॉ. विनोदकुमार जयस्वाल सभागृहात संपन्न झालेले कवी संमेलन विशेष गाजले. विदर्भ साहित्य संघ नागपूर तसेच मराठी विभाग, विद्यासागर कला महाविद्यालय, खैरी बिजेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक व परिसरातील तसेच नागपूर जिल्ह्यातील काही निमंत्रित कवींचे कवी संमेलन श्रावणधारा काव्योत्सव या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आले.

या कवी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते तर उद्घाटक म्हणून अध्यक्ष दीपक गिरधर उपस्थित होते. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, प्रकाश एदलाबादकर, ज्योत्स्ना पंडित, विद्यासागर कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश सोमकुवर, मराठी विभाग प्रमुख डॉ. गिरीश सपाटे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणातून वि.सा.संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी सुंदर आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आणि पुन्हा रामटेकच्या भूमीमध्ये यापेक्षाही मोठ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश सोमकुवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

श्रावणधारा काव्योत्सव कवी संमेलनाचे बहारदार आयोजन करण्यात आले. या कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी कथाकार वसंत वाहोकर होते. यात अनेक जुन्या नव्या कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांना श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. सौंदर्यवादी तसेच सामाजिक आशयाच्या कविता सादर करून अनेक कवींनी रसिकांच्या, उपस्थितांच्या हृदयावर आपल्या काव्याची छाप उमटवली. जवळपास सर्वच कवींच्या कविता भाव खाऊन गेल्यात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. गिरीश सपाटे यांनी केले. आभार गंगा मोंढे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी विद्यासागर महाविद्यालयातील मराठी विभाग, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, विदर्भ साहित्य संघ, शाखा रामटेक, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: