Monday, December 23, 2024
Homeराजकीयएक तारखेला राणाच्या बैठकीतले व्हिडीओ रिलीज करणार...आमदार बच्चू कडू यांचा इशारा...

एक तारखेला राणाच्या बैठकीतले व्हिडीओ रिलीज करणार…आमदार बच्चू कडू यांचा इशारा…

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद आता कमी होत नसल्याचे दिसत असून तो आणखी पेटणार असल्याचे बच्चू कडू यांनी संकेत दिले आहे. त्यांनी TV 9 या वृत्तवाहिनीशी बोलतांना आक्रमक दिसले. तर यावेळी त्यांनी आमदार रवी राणा यांच्या बैठकीतील एक Video रिलीज करणार असल्याचे सांगितल्याने येणाऱ्या १ तारखेला मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बच्चू कडू म्हणाले, “त्यानी माझ्या मतदारसंघात येऊन म्हटलं की बाप बेटा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या.. बाप आणि भैय्यापेक्षा तुला रुपया मोठा असेल. मला नाही. ती तुझी औलाद असेल”, अशा शब्दांत कडूंनी रवी राणांवर टीकास्र सोडलं.

“उद्या या सगळ्यात माझी राख झाली, तरी माझ्याविरोधात झालेल्या आरोपांबद्दल मी पेटणार. मला मंत्रीपदाचं काही देणं-घेणं नाही. मी एवढा कच्चा माणूस नाही. मंत्रीपद काय ब्रह्मदेव पाठवतो का? माणूसच देतो. लोकांनी दिलेली आमदारकी मंत्रीपदापेक्षा लाख मोलाची आहे”, असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले.

“मी नंगा होईन, मला त्याची काही फिकर नाही. बच्चू कडूचं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर. आम्हाला राजकारण सोडावं लागलं तरी बेहत्तर. उद्या राजकारण सोडावं लागलं, तरी मला काही अडचण नाही. ही आरपारचीच लढाई आहे. तुम्ही असे आरोप करत असाल, तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत. आम्ही घालून टाकू नांगर”, अशा शब्दांत बच्चू कडूंनी रवी राणांना सुनावलं आहे.

बच्चू कडूंनी रवी राणांना आणि राज्य सरकारलाही एक नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. त्याआधी यासंदर्भात खुलासा करण्याचं किंवा पुरावे सादर करण्याचं आव्हान त्यांनी दिलं आहे. “एक तारखेला राणाच्या बैठकीतले व्हिडीओ रिलीज करणार. कसं षडयंत्र रचलं जातं ते सगळं समोर येईल. एक तारखेला ट्रेलर असेल. त्यानंतर चित्रपट १५ दिवसांनी पूर्ण होईल”, असं सूचक विधान बच्चू कडूंनी यावेळी केलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: