दरवर्षी आपण गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या आनंदाने व उत्साहाने करतो, गणपती हे एकमेव असे दैवत आहे ज्यांना आपण अनेक प्रकाराने साकारू शकतो. गणपती हे दैवत आपल्या आतील सृजनतेला प्रोत्साहन देणार व आनंद देणार असं दैवत आहे.
कॉलेजमध्ये असताना माझ्याजवळ खराब झालेले अनेक फोटो होते माझ्या फोटोंचं काय करायचं त्यांना फेकायचं का, मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली आपण या फोटोंचा उपयोग काहीतरी तयार करण्यात करावा. मग काय विचार सुरू झाले आणि दुसऱ्याच दिवशी गणपती बाप्पांचा आगमन होणार होतं लगेच माझ्या लक्षात आलं आपण या फोटो पासून गणपती बाप्पा साकारू या.. लगेच कामाला लागले आणि माझे पहिले फोटो पासून तयार केलेले गणपती तयार झाले. तेव्हापासून आजपर्यंत मी अनेक वस्तूंमधून गणपती साकारलेत.
पण हे सारे गणपती माझ्या शुभेच्छा पत्रकांवरच होते. मागील वर्षी मी ठरवलं आपण आपल्या दवाखान्यात स्वतः तयार केलेल्या गणपती ची स्थापना करायची, मग मागील वर्षे डिस्पोजेबल ग्लासचा वापर करून इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करण्यात आली होती.
यावर्षी खास गोव्यावरनं शंख आणि शिंपले बोलून त्यांच्यापासून इको फ्रेंडली गणपती तयार करण्याचा विचार केला व गणपती तयार केला. हे शंख आणि शिंपल्यापासून बनवलेली मूर्ती अडीच फूट उंचीची आहे. व मोठ्या थाटामाटात किंमतकर हॉस्पिटल इथे गणपतीची स्थापना करण्यात आली. माझ्याजवळ अनेक प्रकारच्या गणपतीचा कलेक्शन आहे उदाहरणार्थ पारिजातकांच्या बियांपासून तयार केलेला गणपती, बाभळीच्या बियांपासून तयार केलेला गणपती, तुटलेल्या काचा पासून तयार केलेला गणपती, चटई चे छोटे छोटे तुकडे वापरून तयार केलेल्या गणपती, लग्न पत्रिकेचा वापर करून तयार केलेला गणपती ,खराब झालेले फोटोग्राफ पासून तयार केलेला गणपती, पानांपासून तयार केलेला गणपती ,नावांच्या अक्षरांमधून तयार केलेल्या गणपती असे अनेक प्रकारच्या गणपतीचे कलेक्शन माझ्याजवळ आहे. तसेच लगातार 24 तास शुभेच्छापत्र बनवण्याचा रेकॉर्ड लिमका बुक ऑफ रिकॉर्ड 2020 -21 मध्ये नोंदवण्यात आले आहे.
डॉ अंशुजा किंमतकर